स्वारगेट ते पंढरपूर प्रवासादरम्यान घडली घटना
marathinews2.com
पुणे – बसप्रवासात गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील ४० हजारांचे मंगळसूत्र चोरून नेले. ही घटना २९ सप्टेंबरला सकाळी सातच्या सुमारास स्वारगेट ते पंढरपूर प्रवासादरम्यान घडली आहे. याप्रकरणी चिंचवडमध्ये राहणार्या जेष्ठ महिलेने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
टेलीग्राम टास्कचे आमिष पडले २९ लाखांना – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ महिला चिंचवडमध्ये राहायला असून, २९ सप्टेंबरला सकाळी सातच्या सुमारास स्वारगेट ते पंढरपूर बसने प्रवास करीत होती. त्यावेळी गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील ४० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. फुरसुंगी परिसरात महिलेला गळ्यात मंगळसूत्र नसल्याचे दिसून आले. त्यानंतर महिलेने फुरसुंगी पोलीस ठाण्यात धाव घेउन तक्रार दाखल केली. पोलीस अमलदार प्रवीण पोटे तपास करीत आहेत.



















