Breking News
घरफोडी करणाऱ्या सराईतांना अटक; ८ गुन्हे उघडकीसकुष्ठरोग निर्मूलन समन्वय बैठक संपन्नबालदिनानिमित्त दोन दिवशीय बालकुमार साहित्य संमेलनाचे रोजी आयोजननिवडणूक खर्चाच्याअनुषंगाने दर निश्चितीबाबत बैठक संपन्नजिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती कामकाजाबाबत बैठक संपन्ननगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुका शांतेत, निर्भय आणि न्याय वातावरणात पाडण्याच्यादृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारीनगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारीएटीएस’कडून कोंढवा भागातील संशयितांची झाडाझडतीवारजे, खडकीत अपघातात दोघे ठारनाट्य निर्माते, नाट्य व्यवस्थापकांचा ‌‘रंगयात्री‌’ ॲपला विरोध

मंगळसूत्र घेउन महिलेला दिले पिवळे धातूचे मनी

मंगळसूत्र घेउन महिलेला दिले पिवळे धातूचे मनी

चोरट्या महिलांना २४ तासात अटक

marathinews24.com

पुणे – सोन्याच्या मंगळसूत्रापेक्षा जास्त वजनाचे पिवळे धातू सोनेच असल्याचे भासवून परराज्यातील चोरट्या महिलांना एका महिलेची फसवणूक केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच आंबेगाव पोलिसांनी अवघ्या २४ तासात चोरट्या महिलांचा शोध घेउन त्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून १ लाख २ हजारांचे मंगळसूत्र जप्त केले आहे. ही घटना १५ ऑक्टोबरला दुपारी सव्वा एकच्या सुमारास कात्रजमधील संतोष नगरातील साई मित्र मंडळासमोर घडली होती.

मुंढव्यात तडीपार गुंडाला पकडले – सविस्तर बातमी 

आशाबेन मंगाभाई सरवय्या (वय ५० , सासवड, पुणे मुळ रा. ढोला झोपडपटटी, भावनगर, गुजरात ) आणि सोनू बेन आकाशभाई सरवय्या, (वय ३० गुजरात ) अशी अटक केलेल्या महिलांची नावे आहेत. तक्रारदार महिला १५ ऑक्टोबरला कात्रजमधील संतोषनगरात होती. त्यावेळी दोन्ही चोरट्या महिलांनी तिला पिवळ्या धातूचे मनी दाखविले. तुमच्या गळ्यातील मंगळसूत्रापेक्षा जास्त वजनाचे सोन्याचे मनी असून, आम्हाला गावी जायचे आहे, सांगून महिलेला बतावणी केली. तिचा विश्वास संपादित केल्यानंतर चोरट्यांनी तिला पिवळे धातूचे मनी देउन एक लाखांचे मंगळसूत्र चोरून नेले.

मंगळसूत्र चोरीप्रकरणी आंबेगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पथकाने कात्रज ते सासवड मार्गातील ५० पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यावेळी संबंधित चोरट्या महिला सासवला गेल्याचे दिसून आले. पोलीस अंमलदार प्रमोद भोसले यांना चोरट्या महिला सासवडमधील घरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर, अजय कामठे, शिवाजी पाटोळे, दिक्षा मोरे यांनी सासवडमध्ये जाउन दोन्ही महिलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ८ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र जप्त केले.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त राजेश बनसोडे, उपायुक्त मिलींद मोहिते, एसीपी राहुल आवारे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, पोलीस निरीक्षक गजानन चोरमले, उपनिरीक्षक मोहन कळमकर, शैलेंद्र साठे, चेतन गोरे, हणमंत मासाळ, निलेश जमदाडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, प्रमोद भोसले, ज्ञानेश्वर चित्ते, नितीन कातुर्डे, योगेश जगदाळे, शिवाजी पाटोळे, अजय कामठे, सुभाष मोरे, हरिश गायकवाड, राकेश टेकवडे मपोशि दिक्षा मोरे यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×