Breking News
जेसीबी फसवणूक प्रकरणात चौथ्या रिकव्हरी एजंटला अटकशिरुर, मावळ मधील युवा सेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याकायद्याच्या रक्षकानेच जमिनीच्या वादामध्ये दाखवली बंदूकगावठी कट्टयासह जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या आरोपींना बेड्याअनंतराव पवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिवराज्यभिषेक दिन साजराक्रेडाईकडून पारदर्शक व पथदर्शी काम व्हावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउसण्या पैशांच्या वादातून महिलेचा गळा आवळून खूनखरीप हंगामात युरियासोबतच अन्य खताचा वापर कराAjit Pawar : शिव शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा स्मरण करून सर्वांनी पुढे गेले पाहिजे-उपमुख्यमंत्री अजित पवारदुचाकीच्या डिक्कीतून ऐवजाची केली चोरी

पार्किंगच्या वादातून तरूणाला मारहाण

पार्किंगच्या वादातून तरूणाला मारहाण

लुटमार करणाऱ्या टोळीला सहकारनगर पोलिसांची केली अटक

marathinews24.com

पुणे – मोटार पार्किंगच्या वादातून तरूणाला बेदम मारहाण करीत त्यांच्या गळ्यातील २५ हजारांची सोन्याची चैन हिसकावून नेणार्‍या टोळीला सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना ३ जूनला रात्री पावणे अकराच्या सुमारास धनकवडीतील काशिनाथ पाटील नगरात घडली होती. बबलु विवेक कोठारी (वय ३०, रा. बालाजीनगर, धनकवडी ) लोकेश विवेक कोठारी (वय २१) आणि शाम चांदेकर (वय २१ रा. धनकवडी ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी थेरगावमध्ये राहणार्‍या तरूणाने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

परकीय नागरिकांची माहिती लपविणे अंगलट – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण थेरगावमधील असून, ३ जूनला रात्री पावणेअकराच्या सुमारास धनकवडीतील बालाजीनगरात आले होते. त्याठिकाणी मोटार पार्क करीत असताना टोळक्याने त्यांच्यासोबत हुज्जत घातली. त्यांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करीत जखमी केले. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील २५ हजारांची सोन्याची चैन चोरून नेली होती. घटनेची माहिती मिळताच, सहकारनगर पोलिसांनी तातडीने तपासाला गती दिली. सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपींचा शोध घेत त्यांना अटक केली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top