Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

शेअर ट्रेडींगचे आमिष पडले ३३ लाखांना

सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठ महिलेची फसवणूक

सायबर चोरट्याकडून जेष्ठाची फसवणूक

marathinews24.com

पुणे – शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देतो, अशी बतावणी करीत सायबर चोरट्यांनी जेष्ठ नागरिकाला तब्बल ३३ लाख १९ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना १५ जुलै ते २२ ऑगस्ट कालावधीत माणिकबागेत घडली आहे. याप्रकरणी ६४ वर्षीय जेष्ठाने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वडगाव बुद्रूकमध्ये घरफोडी, पावणेदोन लाखांचे दागिने चोरीला – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ नागरिक सिंहगड रस्ता परिसरातील माणिकबागेत राहायला आहेत. १५ जुलैला सायबर चोरट्यांनी त्यांना संपर्क साधून शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूकीचे आमिष दाखवले. सायबर चोरट्यांनी तक्रारदार जेष्ठाचा विश्वास संपादित केला. त्यानंतर त्यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. तब्बल ३३ लाख १९ हजारांची गुंतवूणक केल्यानंतरही त्यांना परतावा मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर जेष्ठाने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. पोलीस निरीक्षक उल्हास कदम तपास करीत आहेत.

मनी लॉड्रींगसह अतिरेक्यांना पैसे पाठविल्याची बतावणी

दहशतवाद विरोधी पथकाकडून बोलत असल्याची बतावणी करीत सायबर चोरट्यांनी औंधमधील तरूणाला १४ लाख ८ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना १ ते ३ ऑक्टोबर कालावधीत औंधमध्ये घडली असून, याप्रकरणी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर चोरट्यांनी तक्रारदार तरूणाच्या बँक खात्यातून मनी लॉड्रींगसह अतिरेक्यांना पैसे पाठविल्याचे पुरावे असल्याचे सांगितले. त्यांच्या बँक खात्यातील रक्कम तपासण्यासाठी पैसे वर्ग करण्यास भाग पाडले. मात्र, १४ लाखांवर रक्कम पाठवल्यानंतर तक्रारदाराला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक ननवरे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×