वडगाव बुद्रूकमध्ये घरफोडी, पावणेदोन लाखांचे दागिने चोरीला

अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी १ लाख ७० हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना २९ ते ३० ऑक्टोबर कालावधीत वडगाव बुद्रूकमधील संजीवनी कुंजमध्ये घडली आहे. याप्रकरणी महिलेने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कार्यालयाचे कुलूप तोडून साडेचार लाखांची रोकड चोरीला – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला नांदेडसिटी फाटा परिसरात राहायला असून, त्यांच्या वडिलांचा वडगाव बुद्रूक परिसरातील संजीवनी कुंजमध्ये फ्लॅट आहे. संबंधित फ्लॅट बंद असताना चोरट्यांनी कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. घरातील पावणेदोन लाखांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. चोरीच्या घटनेची माहिती झाल्यानंतर महिलेने सिंहगड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर तपास करीत आहेत.

मेडीकलचे कुलूप तोडून साहित्याची चोरी

मेडीकलचे कुलूप तोडून चोरट्यांनी तब्बल १ लाख ८ हजारांच्या साहित्याची चोरी केली आहे. ही घटना २९ ते ३० ऑक्टोबर कालावधीत वडगाव शेरीतील प्रसादनगरात घडली आहे. याप्रकरणी तरूणाने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक ढावरे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×