विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – कार्यालयाबाहेर असलेला पत्रा कापून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश करीत तब्बल साडेचार लाखांची रोकड आणि डिव्हीआर असा ४ लाख ६० हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना २९ ते ३० ऑक्टोबर कालावधीत लोहगावमधील जुना जकात नाका परिसरात घडली आहे. याप्रकरणी दिघीत राहणार्या ४२ वर्षीय नागरिकाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे पोलिसांनी केली ड्रग्जची होळी – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे दिघीत राहायला असून, जुना जकात नाका परिसरात त्यांचे दुकान आहे. २९ ते ३० ऑक्टोबर कालावधीत चोरट्यांनी त्यांच्या दुकानाच्या कार्यालयामागील पत्रा कापून आतमध्ये प्रवेश केला. कार्यालयातील काउंटरचा लॉक तोडून साडेचार लाखांची रोकड आणि डिव्हीआर असा ४ लाख ६० हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. कार्यालयात चोरी झाल्याची घटना दुसर्या दिवशी उघडकीस आली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सपना देवतळ तपास करत आहेत.





















