कुख्यात गुंड नीलेश घायवळच्या साथीदाराकडून ४०० काडतुसे जप्त

२०० काडतुसे झाडल्याचे उघड; रिकाम्या पुंगळ्या जप्त

marathinews24.com

पुणे – शहरातील काेथरूड गोळीबार प्रकरणातील गुंड नीलेश घायवळ याच्या साथीदाराच्या घरात तब्बल ४०० काडतुसे सापडली आहेत. त्यापैकी २०० काडतुसे (जिवंत) आहेत. उर्वरित २०० काडतुसांचा वापर करण्यात आला असून, पोलिसांनी रिकाम्या पुंगळ्या जप्त केल्या आहेत.

निवडणूकीतून माघार घे, नाहीतर तुझा संतोष देशमुख करु’ – सविस्तर बातमी

घायवळ टोळीतील गुंडांनी १७ सप्टेंबरला कोथरूडमधील शास्त्रीनगर परिसरात एकावर गोळीबार केला होता. याप्रकरणात घायवळ टोळीतील गुंड अजय महादेव सरोदे याला अटक केली होती. त्यानंतर घायवळसह साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. घायवळ बनावट कागदपत्रांद्वारे पारपत्र मिळवून लंडनमध्ये गेल्याची माहिती तपासात मिळाली आहे.

घायवळच्या प्रत्यार्पणासाठी पुणे पोलिसांन ब्रिटीश उच्चायुक्तांसी पत्रव्यवहार केला आहे. घायवळला ताब्यात घेण्यात घेण्यासाठी रेड काॅर्नर नोटीस बजाविण्यात आली आहे.

‘याप्रकरणात अटकेत असलेल्या सरोदे याची चौकशी करण्यात आली होती. त्याच्या घराची झडती घेण्यात आली. तेव्हा त्याच्या घरातून तब्बल ४०० काडतुसे जप्त करण्यात आली. त्यापैकी २०० काडतुसांच्या पुंगळ्या सापडल्या आहेत’, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

सरोदे याच्याकडे शस्त्र परवाना आहे. त्याला २९ जानेवारी २०२४ रोजी परवाना मंजुर करण्यात आला होता. सरोदे याच्याविरुद्ध यापूर्वी दोन गुन्हे दाखल झाले होते. या गुन्ह्यात त्याची निर्दोष मुक्तता झाली. पिस्तूल परवाना देताना सरोदे याची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली होती का नाही? याबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे. घायवळ याच्याविरुद्ध पुणे पोलिसांनी आतापर्यंत अकरा गुन्हे दाखल केले आहेत. त्याच्याविरुद्ध वेगवेगळ्या प्रकरणात ‘मकोका’ कारवाई करण्यात आली आहे.

लोणावळ्यातील फार्म हाऊसवर गोळीबाराचा सराव

नीलेश घायवळचा साथीदार अजय सरोदे याचे लोणावळ्यात फार्म हाऊस आहे. तेथे त्याने घायवळसोबत गोेळीबाराचा सराव केला, तसेच अहिल्यानरमधील सोनेगाव येथे त्यांनी गोळीबाराचा सराव केल्याची माहिती चौकशीत मिळाली आहे. सरोदे याच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणावर काडतुसे कशी आली, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.

घायवळच्या घरातून काडतुसे ठेवण्याचा बाॅक्स जप्त करण्यात आला होता. या बाॅक्सवर दारूगोळा कारखान्याचा शिक्का होता. सरोदेला खडकीतील दारूगोळा कारखान्यातून काडतुसे मिळाल्याची शक्यता आहे. ही काडतुसे त्याला कोणी दिली ? यादृष्टीने तपास सुरू आहे. – संभाजी कदम, पोलीस उपायुक्त

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×