Breking News
पहिल्या टप्यात पुणे जिल्ह्यातील ३८ हजार ९७० शेतकऱ्यांची कर्जमुक्ती; ३४५.२५ कोटीचा दिलासापुण्यात पीएमपी बसच्या धडकेत दोन महिलांचा मृत्यूज्येष्ठ नागरिकाची ४ लाख ४३ हजार रुपयांची फसवणूककेंद्रीय अर्थमंत्र्यांच्या ‘डीपफेक व्हिडीओद्वारे फसवणुकगाेळीबार करुन २२ तोळ्यांच्या दागिन्यांची लुटनदीपात्रात नवजात अर्भक मृतावस्थेत सापडलेपरदेशात नोकरीच्या आमिषाने नागपूरमधील महिलेची पोर्तुगालमध्ये विक्रीब्लॅक स्पॉटचे निरीक्षण करून १० ऑक्टोबरपूर्वी आवश्यक उपाययोजनांद्वारे निर्मूलन कराकर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

निवडणूकीतून माघार घे, नाहीतर तुझा संतोष देशमुख करु’

निवडणूकीतून माघार घे, नाहीतर तुझा संतोष देशमुख करु’

पुण्यात आम आदमी पक्षाच्या उमेदवाराला धमकी

marathinews24.com

पुणे – नगरपालिका निवडणुकीतून माघार घे, नाहीतर तुझा संतोष देशमुख करु, अशी धमकी एकाने आम आदमी पक्षाच्या नगराध्यक्ष पदी उभा राहिलेल्या उमेदवाराला दिली आहे. याबाबत यशवंत अरुण बनसोडे (वय ४२, रा. राजमाता सिंधुनगरी पोलीस कॉलनी, भोसले व्हिलेज, फुरसुंगी) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना १ डिसेंबरला सासवड रोड रेल्वे स्टेशनजवळ सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली.

नाहक बदनामी करणाऱ्या महिलेवर कारवाई करा; मला अडकवण्याचा प्रयत्न-आमदार चित्रा वाघ – सविस्तर बातमी  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार बनसोडे यांनी फुरसुंगी नगरपालिकेच्या निवडणुकीत आम आदमीकडून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. १ डिसेंबरला सकाळी साडेसात वाजता त्यांनी मुलाला शाळेत सोडले. तेथून ते काळेपडळमधील पैलवान जीममध्ये गेले होते. त्यानंतर ते मोटारीने साडेआठ वाजता घरी जाण्यास निघाले होते. त्यावेळी सासवड रोड रेल्वे स्टेशनकडून डावीकडे वळुन कच्च्या रस्त्याने भोसले व्हिलेजजवळ ते मोटारीत थांबले होते. त्यावेळी एकाने त्यांची मोटार अडवून काच खाली घेण्यास पाडले.

‘‘तू निवडणुकीतून माघार घे, नाहीतर तुझा संतोष देशमुख करु,’’अशी धमकी दिली. त्याच्याजवळ शस्त्र लपवल्याचे दिसून आल्याचे तक्रारदार यांनी पाहिले. त्यानुसार बनसोडे यांच्या फिर्यादीनुसार फुरसुंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी तपास सुरू करण्यात आला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×