Breking News
आवडते काय आणि येते काय, यातील फरक ओळखा-ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामलेआमदार संजय गायकवाडांविरोधात गुन्ह्याच्या मागणीसाठी रोहित पवारांचा कोथरूड ठाण्यात ठिय्याधर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता संस्थेची ५० कोटींची जमीन तारणदिशाहीन नियोजन व एफएसआय’च्या अनिर्बंध अतार्किक मंजुऱ्यां मुळे ‘पुणे वाहतुक कोंडीच्या’ संकटात…!भरती परीक्षा सुधारणांसाठी शनिवारी पुण्यात सल्लामसलतजिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली चाकण एमआयडीसी परिसरातील पायाभूत सुविधा समितीची बैठक संपन्नएमडी विक्रीच्या तयारीतील त्रिकुटाला बेड्यागणेश विसर्जन मिरवणुकांमधून तंबाखू व अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबवावे- ज्योती कदमपुण्यातील सराईतांना दणका, २२ जण तडीपारपुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दोन सराईत तडीपार

पुण्यात ४ कोटी ११ लाखांचे ४५५ किलो अंमली पदार्थ नष्ट

पुण्यात ४ कोटी ११ लाखांचे ४५५ किलो अंमली पदार्थ नष्ट

‘ड्रग्जमुक्त भारत’ मोहिमेंतर्गत कारवाई; रांजणगाव एमआयडीसीत विल्हेवाट

marathinews24.com

पुणे – केंद्र सरकारच्या ‘ड्रग्जमुक्त भारत’ या संकल्पनेच्या दिशेने पुणे शहर पोलिसांनी महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. शहरातील २३ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत विविध कारवायांमध्ये जप्त केलेला तब्बल ४ कोटी ११ लाख ९१ हजार ७६५ रुपये किमतीचे ४५५ किलो ८४५ ग्रॅम ९४६ मिलीग्रॅम अंमली पदार्थ नष्ट करण्यात आला आहे. मंगळवारी (दि. २५) रांजणगाव एमआयडीसी येथील कारखान्यात ड्रग्जची होळी करण्यात आली. ड्रग डिस्पोजल कमिटीच्या परवानगीने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली जप्त मुद्देमालाची कायदेशीर पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली.

फुरसुंगीत चाकूच्या धाकाने तरुणाला लुटले, आरोपीला अटक – सविस्तर बातमी 

पुणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील २३ ठाण्याच्या हद्दीतील दाखल असलेल्‍या १२३ अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यातील (एनडीपीएस) गुन्ह्यांमध्ये मुद्देमाल जप्त केला होता. गांजा, एमडी, हेरॉईनसह विविध पदार्थ नष्ट करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये ४२५ किलो ४७२ ग्रॅम गांजा (किंमत ८५ लाख ९ हजार ४५६ रुपये), १ किलो १५७ ग्रॅम एमडी (२ कोटी ३१ लाख ४५ हजार ७२० रुपये), १२७ ग्रॅम ५०० मिलीग्रॅम मेथॅम्फेटामाइन(२५ लाख ५० हजार रुपये), ६५ ग्रॅम ५०० मिलीग्रॅम हेरॉईन (२२ लाख ९२ हजार ५०० रुपये) यांचा समावेश आहे.

याशिवाय २०० ग्रॅम ओजीकुश गांजा, १०० ग्रॅम ८७० मिलीग्रॅम चरस, ६५ ग्रॅम ८० मिलीग्रॅम हशिश ऑईल, २४ किलो ८४७ ग्रॅम अफू/दोडाचुरा, तसेच नायट्राझेपम व अल्प्राझोलमच्या गोळ्या नष्ट करण्यात आल्या. ब्राऊन शुगर, गर्द पावडर आणि गांजा मिश्रित पदार्थांचाही जप्त मुद्देमालात समावेश होता.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलिस आयुक्त संजय दराडे, पोलिस उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहायक पोलिस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अंमली पदार्थविरोधी पथक एकमधील वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक जीवन माने, सहायक पोलिस निरीक्षक नितीनकुमार नाईक, सहायक पोलिस निरीक्षक अफरोज पठाण, पोलिस उपनिरीक्षक योगेश कोतकर यांच्यासह पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×