Breking News
पर्वतीत घरफोडी; साडेनऊ लाखांचा ऐवज चोरीलापुण्यात सायबर चोरांकडून चौघांची ३० लाखांची फसवणूकबिल्डर विशाल अग्रवालच्या अडचणी वाढणार ?गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; पुणे विभागातील १०२ लाभार्थ्यांना मिळणार लाभखताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाईग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आषाढीवारी तयारीचा आढावाछळामुळे संगणक अभियंता तरुणीची इमारतीतून उडी मारुन आत्महत्यानशामुक्त भारत अभियानांतर्गत येरवडा येथे जनजागृती कार्यक्रम संपन्नआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजनपुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी २२ जून रोजी सकाळी ११ वाजता विशेष कॅम्प; न्यायिक, अर्धन्यायिक व महसुली प्रकरणांचा जागेवर निपटारा

कोंढव्यात दूरसंचार विभागाची केबल चोरी

कोंढव्यात दूरसंचार विभागाची केबल चोरी

कोंढवा पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – दूरसंचार विभागाकडून (बीएसएनएल) टाकण्यात येणाऱ्या केबलची चोरी करण्यात आल्याची घटना कोंढवा भागात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीएसएनलच्या कनिष्ठ अभियंत्याने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

पीएमपीएल बसप्रवासात महिलेची सोन्याची बांगडी चोरीला – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील कुबेरा पार्क बीएसएनएलकडून भूमिगत केबल टाकण्याचे काम सुरू आहे. या भागात केबल, तसेच अन्य साहित्य (सीटी बाॅक्स) ठेवण्यात आले होते. चोरट्यांनी केबल आणि साहित्य असा २४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली. केबल, तसेच अन्य साहित्य चोरीला गेल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक सचिन थोरात तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×