Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

पीएमपीएल बसप्रवासात महिलेची सोन्याची बांगडी चोरीला

पीएमपीएल बसप्रवासात महिलेची सोन्याची बांगडी चोरीला

भोसरी ते बालाजीनगर बसप्रवासात घडली घटना 

marathinews24.com

पुणे – पीएमपीएल बसप्रवासात गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या हातातील १ लाख रूपये किंमतीची सोन्याची बांगडी चोरून नेली. ही घटना ९ सप्टेंबरला दुपारी सव्वा तीन ते साडेचार वाजण्याच्या सुमारास भोसरी ते बालाजीनगर बसप्रवासात घडली आहे. याप्रकरणी भोसरीत राहणार्‍या ५० वर्षीय महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पुण्यात मोटारीच्या धडकेत दोन वर्षांच्या बालकाचा मृत्यू – सविस्तर बातमी  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला भोसरीत राहायला असून, ९ सप्टेंबरला दुपारी सव्वा तीनच्या सुमारास कामानिमित्त पीएमपीएल बसने प्रवास करीत होती. त्यावेळी बसमध्ये गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या हातातील १ लाख रूपये किंमतीची सोन्याची बांगडी चोरून नेली. दरम्यान, हातात बांगडी नसल्याचे दिसून आल्यानंतर महिलेला चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलीस अमलदार कोळके तपास करीत आहेत.

टोळक्याकडून तरूणाला मारहाण, शस्त्रास्त्राने परिसरात दहशत

दुचाकीला धक्का दिल्याची विचारणा केल्याच्या रागातून टोळक्याने तरूणाला बेदम मारहाण केल्याची घटना १०सप्टेंबरला रात्री आठच्या सुमारास आंबेगावमधील चंद्रभागानगरात घडली. त्यानंतर टोळक्याने हातातील शस्त्रास्त्रे हवेत फिरवून दहशत माजविली आहे. याप्रकरणी तिघांविरूद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे आंबेगाव पठार परिसरात राहायला असून, १० सप्टेंबरला रात्री आठच्या सुमारास दुचाकीवर घरी चालले होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या आरोपींनी तक्रारदाराच्या दुचाकीला धक्का दिला. त्यामुळे तक्रारदाराच्या मित्राने संबंधिताला गाडी नीट चालवा असे सांगितले. त्याच रागातून तिघांनी पुढे जाउन हातात शस्त्रास्त्रे बाळगून तक्रारदाराला मारहाण केली. हातातील शस्त्रे हवेत फिरवून दहशत निर्माण केली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक गणेश मोहिते तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×