Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत ‘सेवा पंधरवाडा २०२५’

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत ‘सेवा पंधरवाडा २०२५’

पुण्यातून होणार राज्यस्तरीय सुरुवात ; १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर पर्यंत राबविला जाणार तीन टप्यातील अभियान

marathinews24.com

पुणे – महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत राज्यभरात ‘सेवा पंधरवाडा २०२५’ या महत्त्वपूर्ण उपक्रमाची अंमलबजावणी होणार असून त्याची राज्यस्तरीय सुरुवात पुण्यातून होत आहे. राष्ट्रनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन (दि. १७ सप्टेंबर) ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती (दि. २ ऑक्टोबर) या कालावधीत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. महसूल विभाग थेट जनतेच्या दैनंदिन प्रश्नांशी निगडित असल्याने, लोकाभिमुख, पारदर्शक व कार्यक्षम प्रशासनाचा अनुभव नागरिकांना मिळावा या उद्देशाने या पंधरवड्याचे नियोजन करण्यात आले आहे.

रोजगाराची सुवर्णसंधी, १७ सप्टेंबरला प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन – सविस्तर बातमी 

महसूल विभागाने १ सप्टेंबर २०२५ रोजी आदेश काढून ‘सेवा पंधरवाडा’ युद्धपातळीवर राबविण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी तीन टप्प्यांची आखणी करण्यात आली आहे.

 पहिला टप्पा – १७ ते २२ सप्टेंबर : पाणंद रस्ते विषयक मोहीम

पाणंद व शिवार रस्त्यांना क्रमांक देणे

सर्वेक्षण करून नोंद न झालेल्या रस्त्यांची नोंद घेणे

शेतरस्त्यांची मोजणी व सीमांकन

शेतरस्त्यांवरील वाद मार्गी लावण्यासाठी रस्ता अदालतांचे आयोजन

दुसरा टप्पा – २३ ते २७ सप्टेंबर : ‘सर्वासाठी घरे’ उपक्रम

सरकारी जमीन कब्जहक्काने घरकुलांसाठी उपलब्ध करून देणे

झोपडपट्टी किंवा अतिक्रमणांना नियमांनुसार नियमित करणे

पात्र लाभार्थ्यांना पट्टे वाटप मोहीम

तिसरा टप्पा – २८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर : नावीन्यपूर्ण उपक्रम
जिल्हाधिकारी स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन नवनवीन कल्पना राबवणार.

या उपक्रमातून जनतेचे प्रश्न प्रत्यक्षात सोडवले जातील आणि पारदर्शक प्रशासनाचा अनुभव मिळेल, असा विश्वास महसूल विभागाने व्यक्त केला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×