Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

कोंढव्यात टोळक्याकडून रिक्षा चालकाला बेदम मारहाण

लग्नाच्या आमिषाने अभियंत्याची ९८ लाखांची फसवणूक

पोलिसांकडून दोघे अटकेत

marathinews24.com

पुणे – टोळक्याने एका रिक्षा चालक तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना नुकतीच कोंढव्यात घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून, त्यांच्याबरोबर असलेल्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहम्मद सोहेल उर्फ पंजाबी आजम खान (वय २५, रा. नवाजीश पार्क, कोंढवा) याने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

शाळकरी मुलाला धमकावून अत्याचार – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मोहम्मद खान हा रिक्षा चालक आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षा चालक खान हा साळुंखे विहार रस्त्यावरील स्मशानभूमीजवळून निघाला होता. त्यावेळी आरोपींनी त्याला अडवून पट्ट्याने मारहाण केली. एका आरोपीने त्याला कोयत्याचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली. पसार झालेल्या दोघा आरोपींना अटक करण्यात आली असून, पसार साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक महाडिक तपास करत आहेत.

बिबवेवाडीत बेकरी कामगाराला मारहाण

बिबवेवाडी भागात एका बेकरी कामगाराला दोघांनी मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी कुणाल वैराट, मंगेश माने (दाेघे रा. बिबवेवाडी गावठाण) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अर्श फैजुल अन्सारी (वय १७) याने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अन्सारी हा बिबवेवाडी गावठाण परिसरातील एका बेकरीत कामाला आहे. १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी किरकोळ कारणावरुन त्याचा आराेपींशी वाद झाला. आरोपींनी अन्सारीला मारहाण केली. दुकानातील वजन काटा फेकून मारला. त्यावेळी बेकरीतील कामगारांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपींनी कामगारांना मारण्याची धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक बाळू चोपडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×