Breking News
जनगणना २०२७ प्रक्रियेला आजपासून प्रारंभ; विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केली स्व-गणना‘दगडूशेठ’ गणपतीला ५ हजार शहाळ्यांचा महानैवेद्यपुण्यात ६७ वा महाराष्ट्र दिन उत्साहात संपन्नपुण्यात भरधाव कारची दोन विद्यार्थिनी धडकगोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीकोरियन वाणिज्य दूतावासातर्फे २८ जून रोजी पुण्यात ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ची प्राथमिक फेरीमहाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णयप्रतिबंधित १३ लाखांचा पानमसाला, तंबाखूचा साठा जप्तमहाराष्ट्रदिनी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमी

मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय

कात्रज बाह्यवळण मार्गावर वेश्याव्यवसाय, गुन्हा दाखल

वेश्याव्यवसाय प्रवृत्त केल्याप्रकरणी महिलेविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – शहरातील मार्केटयार्ड भागात मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकला. कारवाईत पोलिसांनी मसाज पार्लरमधून तरुणींना ताब्यात घेतले. तरुणींना वेश्या व्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. वैशाली रंगनाथ विसपुते (वय ३१, सध्या रा. टिळेकरनगर, कोंढवा, मूळ रा. तळणी, ता. सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर) असे गुन्हा दाखल केलेल्या महिलेचे नाव आहे. पोलीस हवालदार अश्रृबा मोराळे यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शिकवणीच्या नावाखाली शाळकरी मुलीवर अत्याचार – सविस्तर बातमी 

मार्केटयार्डातील सोसायटीत आरोपी वैशाली विसपुते ही वसुंधरा आयुर्वेदिक मसाज सेंटर चालवित होती. मसाज सेंटरच्या नावाखाली तेथे वेश्याव्यवसाय सुरू होता. मसाज सेंटरमधील तरुणींना पैशांचे आमिष दाखवून विसपुते त्यांना वेश्या व्यवसायास प्रवृत्त करत असल्याची माहिती स्वारगेट पोलिसांना मिळाली. मंगळवारी (२३ सप्टेंबर) दुपारी साडेचारच्या सुमारास पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून मसाज सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खातरजमा केली. त्यानंतर पोलिसांनी तेथे छापा टाकला. कारवाईत मसाज पार्लरमधील तरुणींना ताब्यात घेण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम तपास करत आहेत.

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top
×