Breking News
‘जनगणना २०२७’ कल्याणकारी योजनांची सुनिश्चिती- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारबुद्ध पौर्णिमेनिमित्त ‘धम्म पहाट’ला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसादभोर तालुक्यात बालिकेवर अत्याचार करून खूनलाच मागितल्यापकरणी पोलीस उपनिरीक्षकाला अटकदारू पिण्याच्या वादातून मजुराच्या डोक्यात दगड घालून खून“संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा गौरव: संघर्षाने उभारलेला हे राज्य, आजची वास्तविकता!” – विशेष लेखजिल्ह्याच्या विकासाच्यादृष्टीने माहितीचा संग्रह निर्मितीसाठी स्व-गणना महत्वपूर्ण-अपर जिल्हाधिकारी सतीश राऊतमहापौर रवि लांडगे यांचा स्वगणनेतून जनगणना २०२७ मोहिमेला शुभारंभबारामती पोटनिवडणूक मतमोजणी ४ मे रोजी; प्रशासनाची जय्यत तयारीमुंबई-पुणे प्रवासातील वाहतूक कोंडी फुटली; ‘मिसिंग लिंक’ म्हणजे आधुनिक अभियांत्रिकीचा चमत्कार

बोलणे बंद केल्यामुळे मैत्रिणीला केली बेदम मारहाण

डिजिटल लॉक उघडून २७ लाखांचे दागिने लांबवले

हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – बोलणे बंद केल्याच्या रागातून तरूणाने तरूणीवर लोखंडी वस्तूने हल्ला करीत जखमी केले. ही घटना २३ सप्टेंबरला रात्री दहाच्या सुमारास हडपसरमधील गोंधळेनगरात घडली आहे. प्रणय भानुदास पाटोळे (वय २३ रा. गाडीतळ, हडपसर) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी १९ वर्षीय तरूणीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

नवरात्रोत्सवात पादचारी महिलेचे दागिने हिसकावले – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूणी हडपसर परिसरातील गोंधळेनगरमध्ये राहायला आहे. आरोपी प्रणय आणि तिच्यात काही दिवसांपासून मैत्री होती. मात्र, तरूणीने त्याच्यासोबत बोलणे बंद केले होते. त्याच रागातून २३ सप्टेंबरला आरोपी प्रणयने गोंधळेनगरात जाउन तक्रारदार तरूणीला घराबाहेर बोलावले. तु माझ्याशी बोलणे बंद का केले आहे, अशी विचारणा करीत तिच्यावर लोखंडी वस्तूचे हल्ला चढवित जखमी केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक उमेश रोकडे तपास करीत आहेत.

कुंजीरवाडीत घरफोडी, ८ लाखांचा ऐवज चोरीला

पुणे – घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी पावणेदोन लाखांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा ७ लाख ९० हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना २३ ते २४ सप्टेंबर कालावधीत हवेली तालुक्यातील कुंजीरवाडीत घडली आहे. याप्रकरणी ७१ वर्षीय नागरिकाने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे लोणी काळभोर परिसरातील कुुंजीरवस्तीवर राहायला आहेत. २३ सप्टेंबरला मध्यरात्रीच्या सुमारास संबंधित तक्रारदार घरात झोपले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या घराच्या खोलीचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. कपाटातील पावणेदोन लाखांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा जवळपास आठ लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक बिराजदार तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×