Breking News
गोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीकोरियन वाणिज्य दूतावासातर्फे २८ जून रोजी पुण्यात ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ची प्राथमिक फेरीमहाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णयप्रतिबंधित १३ लाखांचा पानमसाला, तंबाखूचा साठा जप्तमहाराष्ट्रदिनी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमीपुण्यात क्लोरिन सिलेंडरमध्ये तयार झाल्याने विषारी वायू पसरलाआयटी कंपनीत मॅनेजर असल्याची बतावणीने ड्रायव्हरने केले लग्नपुण्यातील १४ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्हनाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच दिले पाहिजे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

बारामती येथे ‘संविधान जनजागृती मार्गदर्शन कार्यशाळा’ संपन्न

विद्यार्थ्यांमध्ये संविधान जनजागृतीसाठी कार्यशाळा आयोजित

marathinews24.com

बारामती – महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य ॲड गोरक्ष लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती आणि विद्या प्रतिष्ठान कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संविधान जनजागृती मार्गदर्शन कार्यशाळा’ विद्या प्रतिष्ठान कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आली.

कायदा-सुव्यवस्थासह प्रतिबंधात्मक कारवाई आवश्यक – सविस्तर बातमी

यावेळी जिल्हा दक्षता समितीचे सदस्य अनिकेत मोहिते, ॲड. अमोल सोनवणे, गटविकास अधिकारी किशोर माने, गटशिक्षणाधिकारी निलेश गवळी, विस्तार अधिकारी नवनाथ कुचेकर, नीलिमा मेमाणे, विद्या प्रतिष्ठान कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य भरत शिंदे आदी उपस्थित होते.

ॲड. गोरक्ष लोखंडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील विविध प्रसंगाची माहिती दिली. याद्वारे भारतीय संविधानाचे महत्त्व समजावून सांगितले. भारताचे संविधानाचे नागरिकांच्या दैनंदिन जीवनात महत्वाचे स्थान आहे, असेही ॲड. लोखंडे म्हणाले.

शिंदे यांनी संविधानाबाबत आपले विचार व्यक्त केले. मोहिते, आणि ॲड.सोनवणे यांनी तसेच संविधानाचे आपल्या जीवनातील महत्त्वाबाबत विचार व्यक्त केले.

यावेळी कार्यशाळेत संविधान उद्देशिकाचे वाचन करण्यात आले. तसेच संविधान जनजागृतीबाबत चित्रफीत दाखविण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी किशोर माने यांनी केले. तर गवळी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×