फ्लॅटचे कुलूप तोडून दागिने लांबविले

कोथरूडमध्ये घरफोडी- साडेपाच लाखांचा ऐवज चोरी

नगर रस्त्यावरील वाघोली भागातील घटना

marathinews24.com

पुणे – फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील ९७ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना नगर रस्त्यावरील वाघोली भागात घडली. याबाबत एकाने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीएमपीएल प्रवासी महिलेची दीड लाखांची बांगडी लंपास – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे वाघोलीतील सिद्धार्थनगर भागात असलेल्या एका सोसायटीत राहायला आहेत. तक्रारदार आणि कुटुंबीय मंगळवारी (३० सप्टेंबर) सकाळी दहाच्या सुमारास सदनिका बंद करुन बाहेर पडले. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. कपाटातील ९७ हजार रुपयांचे दागिने लांबवून चोरटे पसार झाले. दीड तासानंतर तक्रारादार घरी परतले. तेव्हा घरफोडी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलीस उपनिरीक्षक काळे तपास करत आहेत.

खराडीत महिलेचे दागिने हिसकावले

नवरात्रोत्सवात पादचारी महिलांकडील दागिने हिसकाविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नगर रस्त्यावरील खराडी भागात दुचाकीस्वार चोरट्यांनी पादचारी महिलेकडील एक लाख सात हजार रुपयांची सोनसाखळी हिसकावून नेल्याची घटना घडली. याबाबत महिलेने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, तक्रारदार महिला आणि तिची मैत्रीण खराडीतील अनुसया पार्क भागातून सोमवारी (२९ सप्टेंबर) रात्री दहाच्या सुमारास निघाल्या होत्या. त्यावेळी आरपीएस सोसायटीसमोर दुचाकीस्वार चोरटयांनी तक्रारदार महिलेच्या गळ्यातील एक लाख सात हजार रुपयांची सोनसाखळी हिसकावून नेली. महिलेेने आरडाओरडा केला. चोरटे भरधाव वेगात दुचाकीवरुन पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत असून, पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले आहे. सहायक पोलीस निरीक्षक गोडसे तपास करत आहेत.

नवरात्रोत्सवात पादचारी महिलांकडील दागिने हिसकाविण्याच्या तीन घटना घडल्या आहेत. बालेवाडी, हडपसर, तसेच खराडी भागात दागिने हिसकावण्याच्या घटना घडल्या आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×