Breking News
पुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे

कात्रज बाह्यवळण मार्गावर अवजड वाहनांना बंदी

कात्रज बाह्यवळण मार्गावर अवजड वाहनांना बंदी

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

marathinews24.com

पुणे – कात्रज बाह्यवळण मार्गावर अवजड वाहनांस १५ ऑक्टोबरपासून कात्रजकडून किवळेकडे जाणाऱ्या मार्गिकेवर सकाळी ८ ते ११ वाजेदरम्यान तसेच किवळे ते कात्रजकडे जाणाऱ्या मार्गिकेवर सायंकाळी पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत जड, अवजड वाहनांना पुढील आदेश येईपर्यंत बंदी करण्यात असल्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जारी केले आहेत.

शिवाजीनगर मतदार संघातील पात्र मतदारांना नोंदणी करण्याचे आवाहन – सविस्तर बातमी 

आदेशात पुणे-बेंगलोर महामार्ग क्रमांक ४८ व महामार्ग क्र.४ कडे जाणाऱ्या मार्गिकेवर (जुना पुणे- मुंबई महामार्गावर) किवळेकडून कात्रजकडे जाणाऱ्या जड अवजड वाहनांना सायंकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत बंदी करण्यात आली आहे.

सातारा-सांगली-कोल्हापूर बाजूने बेंगलुरू महामार्गावरुन येणारी वाहने शिंदेवाडी टोलनाक्याच्या पुढे येणार नाहीत. तसेच नवी मुंबई, ठाणे, रायगड बाजुने बेंगलोर महामार्गावरुन जाणारी वाहने उर्से टोल नाक्याच्यापुढे व जुना मुंबई-पुणे महामार्गावरील वाहने वडगाव फाट्याच्या पुढे प्रवेश करणार नाहीत. अत्यावश्यक सेवेतील वाहने व पुणे शहरात अंतर्गत भागात जाणारी-येणारी वाहतूकीस हा बंदी आदेश लागू राहणार नाहीत, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×