Breking News
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापर

दिवाळीमुळे भिडे पुलावरील वाहतूक पूर्ववत

सकाळी ६ ते रात्री १० पर्यत भिडे पूल वाहतुकीस खुला

marathinews24.com

पुणे – शहरातील मध्यवर्ती भिडे पुलावरील वाहतूक शनिवारपासून (११ ऑक्टोबर) पूर्ववत करण्यात येणार आहे. सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत भिडे पुलावरील वाहतूक सुरू राहणार आहे. भिडे पूल मेट्रो पुलाच्या कामानिमित्त गेल्या काही महिन्यांपासून बंद आहे. नारायण पेठेतून डेक्कन जिमखान्याकडे जाणारे, तसेच नदीपात्रातील रस्त्याने डेक्कन जिमखाना, तसेच नारायण पेठेत ये-जा करणारे वाहनचालक भिडे पुलाचा वापर करतात.

मुंबईची नव प्रभात; भारत-ब्रिटन संबंधांसाठी ‘ब्रिस्क’ युगाची सुरुवात – सविस्तर बातमी

भिडे पूल बंद असल्याने वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत होता. वळसा घालून पुन्हा डेक्कन जिमखान्याकडे यावे लागत होते. भिडे पुलावरील वाहतूक सुरू करण्याची मागणी सजग नागरिक मंचाने केली होती. दिवाळीत खरेदीसाठी होणारी गर्दी विचारात घेऊन शनिवारपासून (११ ऑक्टोबर) भिडे पूल सकाळी सहा ते रात्री दहा यावेळेत वाहतुकीस खुला करुन देणारा आहे. रात्री दहानंतर मेट्रो पुलाच्या कामानिमित्त भिडे पूल वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. पुढील आदेश येईपर्यंत या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार नाहीत, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×