Breking News
पुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे

विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसचा अपघात; ८ विद्यार्थी जखमी

ऊरळी कांचन परिसरात घडला अपघात

marathinews24.com

पुणे – विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसचा अपघात झाल्याची घटना बुधवारी (दि. ८) दुपारी पुणे-सोलापूर महामार्गावरील ऊरळी कांचन परिसरात घडली. बसच्या पाठीमागून येणाऱ्या ट्रक आदळला. सळई वाहतूक करणााऱ्या ट्रकमधील सळई बसची काच फोडून आत शिरली. या अपघातात ८ विद्यार्थी जखमी झाले. सुदैवाने अपघातात विद्यार्थांना गंभीर स्वरुपाची दुखापत झाली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.

दिवाळीमुळे भिडे पुलावरील वाहतूक पूर्ववत – सविस्तर बातमी

पुणे-सोलापूर महामार्गावरुन बस बुधवारी दुपारी ऊरळी कांचनकडे निघाली होती. बसमध्ये २० ते २५ विद्यार्थी होते. त्यावेळी अचानक एक दुचाकीस्वार आडवा आल्याने बस चालकाने प्रसंगावधान राखून ब्रेक दाबला. त्यावेळी पाठीमागून सळई वाहतूक करणारा ट्रक होता. ट्रकने बसला पाठीमागून धडक दिली. ट्रकवर ठेवलेल्या सळई काच फोडून आत शिरली. या घटनेत सहा विद्यार्थी जखमी झाले. बस चालकने आणि नागरिकांनी बसमधील विद्यार्थ्यांना बाहेर काढले. काचेचे तुकडे उडाल्याने मुलांना किरकोळ दुखापत झाली आहे. काही मुलांंवर ऊरळी कांचन येथील रुग्णालयात उपचार करून सोडून देण्यात आले, अशी माहिती उरळी कांचन पोलीस ठाण्याचे पाेलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिली. तसेच बसला आडवा आलेला ७० वर्षीय दुचाकीस्वार जखमी झाले आहेत. त्यांच्यावर लोणी काळभोर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×