Breking News
Savitri Umed Mall Pune : सावित्री-उमेद मॉल’मधून ग्रामीण महिला उद्योजकतेला मिळणार नवी दिशाKhed Solar Agriculture Project : शेतकऱ्यांना पाणी अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देण्यावर शासनाचा भर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारPanmandwadi Solar Project : सौर प्रकल्पांतून शेतीसाठी दिवसा वीज;शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत– सुनेत्राताई पवारCA Anuj Goyal Pune : जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय सनदी लेखापालांचे योगदान मोलाचेPune House Burglary Case : चार राज्यात तपास, दोघांना उत्तर प्रदेशातून बेड्याPune Mangalsutra Theft Case : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सराईत जेरबंदDiwali Eye Safety Tips : फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे कायमस्वरूपी अंधत्वाचा धोका-नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभातेपायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासू-सासरा अटकेतMercedes Benz Electric GLC Chakan : महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसDr Neelam Gorhe Congress Statement : काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीत महिला सन्मानाला स्थान आहे का-डॉ. नीलम गोऱ्हे

पक्षी, वन्यजीवांच्या छायाचित्रांच्या ‌‘फेदरएन्‌‍टेल‌’ प्रदर्शनाला सुरुवात

पक्षी, वन्यजीवांच्या छायाचित्रांच्या ‌‘फेदरएन्‌‍टेल‌’ प्रदर्शनाला सुरुवात

मोहक पक्षी आणि दुर्मिळ वन्यजीवांची सुंदर छायाचित्रे

marathinews24.com

पुणे – भारताच्या कानाकोपऱ्यात भ्रमंती करून डॉ. पूनम शहा यांनी आपल्या कॅमेऱ्यातून टिपलेल्या अनेक दुर्मिळ आणि मोहक पक्षी आणि वन्यजीवांच्या छायाचित्रांचे ‌‘फेटरएन्‌‍टेल‌’ प्रदर्शन पक्षी आणि निसर्ग प्रेमींसाठी शुक्रवारपासून( दि.३१) खुले झाले आहे. वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत महिलेने वन्यजीव विषयक छायाचित्रांचे भरविलेले एकल (सोलो) प्रदर्शन आहे. कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण कलादालनात हे प्रदर्शन भरविण्यात आले असून प्रदर्शनाचे उद्घाटन माजी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये यांच्या हस्ते झाले. प्रदर्शन दि. 2 नोव्हेंबरपर्यंत सकाळी 10 ते रात्री 8 वेळात सर्वांसाठी खुले आहे.

महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या (MOA) निवडणुकीसाठी अजित पवार गटाच्‍या ऑलिम्‍पिक पॅनेलची घोषणा – सविस्तर बातमी 

डॉ. पूनम शहा या वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असून गेल्या 12 वर्षांपासून वाइल्ड लाइफ फोटोग्राफी करीत आहेत. फोटोग्राफीच्या निमित्ताने त्यांनी संपूर्ण भारतात भ्रमंती केली असून भारतीय उपखंडातील 950 पेक्षा जास्त पक्ष्यांचे छायाचित्रण केले आहे. या प्रदर्शनात निवडक 140 छायाचित्रे प्रदर्शित करण्यात आली आहेत. सरडे, साप, बेडूक यांच्यासह स्नो लेपर्ड, काबिनीचा ब्लॅकी तसेच हिमाचल, स्पिती, उत्तर पूर्व भारतातील अनेक दुर्मिळ आणि सुंदर पक्षी या प्रदर्शन पाहता येणार आहेत. प्रदर्शनाविषयी डॉ. पूनम शहा म्हणाल्या, वैद्यकीय व्यवसात असले तरी एखादी कला जोपासावी या हेतूने छायाचित्रण करण्यास सुरुवात केली. निसर्गात भटकंती करून स्वत: काढलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवावे हे अनेक वर्षांचे स्वप्न होते. सुधीर हसमनीस यांच्या पुढाकारातून हे स्वप्न पूर्ण झाले आहे.

सुनील लिमये म्हणाले, वाइल्ड लाइफ फोटोग्राफीमध्ये महिलांचे प्रमाण फारच कमी आहे. डॉ. पूनम शहा यांनी काढलेली छायाचित्रे खूपच सुंदर व प्रभावी असून प्रदर्शनाच्या माध्यमातून एक वेगळा अनुभव घेता येणार आहे. कलात्मक फोटोग्राफी करण्यासाठी उपकरणे जशी चांगली लागतात. त्याचप्रमाणे पुरेसा वेळ आणि पेशन्सही लागतात. प्रसिद्ध निसर्ग छायाचित्रकार सुधीर हसमनीस यांनी प्रास्ताविक केले. आभार गायत्री हसबनीस पिंपळे यांनी मानले.

नोटीस मिळाली; सिंहिणीला पिल्ले झाली, जबाबदार कोण? नोकरीनिमित्त अनेक ठिकाणी भटकंती झाली पण कॅमेरा घेऊन स्वत: फोटो काढले नाही याची खंत वाटते. असे सांगून सुनील लिमये पुढे म्हणाले, बंदीस्त असलेल्या झूमधील प्राणांना पिल्ले होऊ देत नाही. कारण त्यांच्या पिल्लांवरही बंदीस्त राहण्याची वेळ येते. असा नियम अन्यायकारक वाटल्याने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील सिंह-सिंहिणीला एकत्र येऊ देण्यासाठी मोकळे साडले. काही दिवसानंतर सिंहिणीला पिल्ले होणार असल्याचे समजले. यथाअवकाश तिला तीन पिल्ले झाली. त्यात दोन नर आणि एक मादी होते. ही माहिती समजल्यानंतर पिल्ले पाहण्यासाठी प्राणी संग्रहालयात पर्यटकांची संख्याही वाढली होती.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×