Breking News
जनगणना २०२७ प्रक्रियेला आजपासून प्रारंभ; विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केली स्व-गणना‘दगडूशेठ’ गणपतीला ५ हजार शहाळ्यांचा महानैवेद्यपुण्यात ६७ वा महाराष्ट्र दिन उत्साहात संपन्नपुण्यात भरधाव कारची दोन विद्यार्थिनी धडकगोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीकोरियन वाणिज्य दूतावासातर्फे २८ जून रोजी पुण्यात ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ची प्राथमिक फेरीमहाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णयप्रतिबंधित १३ लाखांचा पानमसाला, तंबाखूचा साठा जप्तमहाराष्ट्रदिनी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमी

शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष; २४ लाखांची फसवणूक

शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष; २४ लाखांची फसवणूक

वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – वाघोली भागातील तरुणाची शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने २४ लाख ८१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत तरुणाने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशाच पद्धतीने बिबवेवाडी भागातील एका महिलेची सायबर चोरट्यांनी दहा लाख ८९ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत एका ४१ वर्षीय महिलेने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सूरज बेंद्रे तपास करत आहेत.

धनकवडी भागात ज्येष्ठ महिला मृतावस्थेत सापडली – सविस्तर  बातमी 

कोंढवा भागातील एका तरुणाची सायबर चोरट्यांनी शेअर बाजराात गुंतवणुकीच्या आमिषाने दहा लाख ९८ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप तपास करत आहेत.

एपीके फाईल पाठवून व्यावसायिकाची फसवणूक

व्यावसायिकाच्या मोबाइलवर प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे चलन एपीके फाईलच्या माध्यमातून पाठवून अडीच लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका व्यावसायिकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार व्यावसायिक तरुण कात्रज भागातील खोपडेनगर भागात राहायला आहे.

चोरट्यांनी त्याच्या मोबाइल क्रमांकावर दंडात्मक चलन असलेली एपीके फाईल ६ सप्टेंबर रोजी पाठविली होती. तरुणाने संबंधित फाईल उघडली. तेव्हा त्यात ५०० रुपये दंड असल्याचे नमूद करण्यात आले होते. तरुणाने ही फाईल पुन्हा उघडली. तेव्हा चोरट्यांनी तरुणाच्या बँक खात्याची मााहिती घेतली. गोपनीय माहितीचा गैरवापर करुन चोरट्यांनी तरुणाच्या खात्यातून दोन लाख ५५ हजार रुपये लांबविले. त्यानंतर तरुणाने सायबर पोलिसांकडे तक्रार दिली. वरिषठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×