Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

धनकवडी भागात ज्येष्ठ महिला मृतावस्थेत सापडली

वाघोली परिसरात संगणक अभियंता महिलेसह दोघींची आत्महत्या

चोरीच्या उद्देशाने खून झाल्याचा संशय

marathinews24.com

पुणे – शहरातील धनकवडीतील शंकर महाराज वसाहतीतील घरात ७५ वर्षीय महिला मृतावस्थेत सापडल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. महिलेच्या अंगावरील दागिने आणि घरात ठेवलेली २० ते २५ हजारांची रोकड चोरीला गेली असून, ज्येष्ठ महिलेचा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणाचा सहकारनगर पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

दुचाकी चोरट्याचे वय अवघे ६७; रिव्हाॅल्वरसह १० काडतुसे जप्त – सविस्तर बातमी 

कुसुम पन्हाळे (वय ७५, रा. शंकर महाराज वसाहत, धनकवडी, पुणे-सातारा रस्ता) असे मृतावस्थेत सापडलेल्या महिलेचे नाव आहे. घटनेची नोंद सहकारनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. शुक्रवारी (३१ ऑक्टोबर) सकाळी कुसुम पन्हाळे राहत्या घरात बेशुद्धावस्थेत पडल्याची माहिती रहिवाशांनी पोलिसांना दिली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांना त्वरीत ससून रुग्णलायात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. पन्हाळे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, शवविच्छेदन अहवालात त्यांच्या मृत्युमागचे कारण समजेल, अशी माहिती सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार यांनी दिली.

पन्हाळे यांची विवाहित मुलगी धनकवडीतील बालाजीनगर भागात राहायला आहे. त्यांच्या मुलीला या घटनेची माहिती देण्यात आली. त्यांची मुलगी शंकर महाराज वसाहतीतील घरी आली. तिने घराची पाहणी केली. तेव्हा घरात ठेवलेले २० ते २५ हजार रुपये चोरीला गेल्याचे तिने सांगितले, तसेच आईने परिधान केलेले चार तोळ्यांचे दागिने चोरीला गेल्याची माहिती मुलीने पाेलिसांना दिली आहे. प्राथमिक तपासात ज्येष्ठ महिलेचा खून चोरीचा उद्देशातून झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. चोरटा माहितगार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×