Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

२७ ऊसतोड कामगारांना बंधमुक्त करून मूळ गावी रवाना

२७ ऊसतोड कामगारांना बंधमुक्त करून मूळ गावी रवाना

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

marathinews24.com

पुणे – अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील मानेवाडी (ता. कोपरगाव) येथील श्री. नाना जाधव यांनी जिल्हा विधी सेवा समिती, पुणे व जिल्हाधिकारी (स.यो.) पुणे यांचेकडे अर्ज देऊन आपले तसेच इतर नऊ कुटुंबांतील ऊसतोडणीस गेलेले कामगार मौजे राहु (माधवनगर), ता. दौंड, जि. पुणे येथील जमीनमालक हिरामण गणपत गाढवे यांनी बंधक ठेवले असल्याची तक्रार केली होती. संबंधित मालकाने कामगारांना मूळ गावी जाण्यास सक्ती केली होती तसेच मारहाण, शिवीगाळ, दमदाटी व महिलांचा अनादर करण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले होते.

योग्य भूमी अभिलेखांसाठी सुलभ बदल नोंद प्रक्रिया महत्त्वाची – मनोज जोशी – सविस्तर बातमी 

या तक्रारीची दखल घेऊन जिल्हा विधी सेवा समिती, पुणे यांच्या वतीने अॅड. देवभक्त महापुरे, अॅड. सुनिल म्हस्के आणि दीपक पवार यांची समिती गठीत करण्यात आली. समितीतील सदस्य, स्थानिक महसूल प्रशासन, पोलीस यंत्रणा, कामगार आयुक्तालयाचे प्रतिनिधी, मंडळ अधिकारी जयंत भोसले, ग्राम महसूल अधिकारी राहु, कामगार विभाग, पोलीस प्रशासन तसेच स्वयंसेवी संस्थेचे कर्मचारी यांनी घटनास्थळी जावून कारवाई केली.

या संयुक्त मोहिमेत एकूण २७ ऊसतोड वेठबिगार कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना बंधमुक्त करण्यात येऊन संबंधित जमीनमालक हिरामण गणपत गाढवे यांच्याविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात “The Bonded Labour System (Abolition) Act, 1976” अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सर्व कामगारांना आवश्यक प्रमाणपत्रे देऊन त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी वाहतुकीची सोय करून देण्यात आली. ही कारवाई दिनांक २९ ऑक्टोबर २०२५ रोजी पूर्ण करण्यात आली. ही संपूर्ण कारवाई जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×