Breking News
मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावेखरीप पिकांसाठी रुंद सरी-वरंबा (BBF) पद्धतीने पेरणी करण्याचे आवाहनशिवाजीनगरमधील हाॅटेलमध्ये देहविक्रय

शहरात आणखी नवीन 7 स्वस्त धान्य दुकाने सुरू होणार

दुकानांचा कारभार महिला बचत गटांच्या हाती

marathinews24.com

पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात आणखी नवीन सात स्वस्त धान्य दुकाने सुरू होणार आहेत. विशेष म्हणजे या सर्व दुकानांचा कारभार महिलांच्या हाती येणार आहे.

पदवीधर-शिक्षक मतदार नोंदणीसाठी ६ नोव्हेंबरपर्यंत मुदत : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी – सविस्तर बातमी

पिंपरी चिंचवड शहरातील रेशन विभागाचे चिंचवड (अ) पिंपरी (ज )आणि भोसरी( फ) हे तीन विभाग असून चार लाख 89 हजार 337 लाभार्थी आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी नवीन सात दुकानांना मंजुरी दिल्याने शहरातील स्वस्त धान्य दुकानांची संख्या 253 वरून 260 झाली आहे.
अ परिमंडळ विभागात डांगे चौक गणेश नगर काळा खडक येथील राजनंदिनी महिला बचत गट , रहाटनी रामनगर येथील कमल महिला बचत गट, पिंपळे निलख येथील श्री माऊली महिला स्वयंसाहाय्यता बचत गट, मामुर्डी शितोळे नगर येथील सिद्धिविनायक महिला बचत गट यांना दुकाने मंजूर झाली आहेत.

ज परिमंडळ विभागात वैभव नगर तपोवन मंदिर रोड पिंपरी गाव येथील पुनाकर माता महिला बचत गट, दापोडी येथील स्वामी समर्थ महिला बचत गट, चिंचवड स्टेशन येथील लक्ष्मीदेवी महिला बचत गट यांना दुकाने मंजूर झाली आहेत. शहरात 3710 जण अंत्योदय आणि 88,641 जण अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत आहेत यापैकी अ विभागात चार आणि ज विभागात तीन अशी एकूण सात दुकाने सुरू होणार आहेत

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×