शेअर मार्केटमधील गुंतवणूक पडली ३२ लाखांना

शेअर मार्केटमधील गुंतवणूक पडली ३२ लाखांना

विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, अशी बतावणी करीत सायबर चोरट्यांनी एका ५८ वर्षीय महिलेला तब्बल ३२ लाखांचा गंडा घातला आहे. ही घटना २४ जुलै ते १४ ऑगस्ट कालावधीत विमानतळ परिसरातील चिरके कॉलनीत घडली आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार तरूण ठार – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला चिरके कॉलनीत राहायला असून, २४ जुलैला सायबर चोरट्यांनी त्यांना संपर्क साधला. शेअर मार्वेâटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देतो अशी बतावणी केली. सायबर चोरट्यांनी तक्रारदार महिलेचा विश्वास संपादित केल्यानंतर त्यांना रक्कम वर्ग करण्यास भाग पाडले. तब्बल ३२ लाखांची रक्कम वर्ग केल्यानंतरही त्यांना परतावा मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव तपास करीत आहेत.

ट्रेडींगच्या नावाखाली पावणेसात लाखांना गंडा

शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी ५८ वर्षीय नागरिकाला ६ लाख ७० हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना २५डिसेंबर २०२३ ते १२ फेबु्रवारी २०२४ कालावधीत सिंहगड रोड परिसरातील इमारतीत घडली आहे. याप्रकरणी तक्रारदाराने नुकतीच सिंहगड रोड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार मोबाइलधारक आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक उल्हास कदम तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×