मोटारीतून दागिने ठेवलेली पर्स चोरीला

मोटारीतून दागिने ठेवलेली पर्स चोरीला

अज्ञात चोरट्यांविरूद्ध पोलिसांनी केला गुन्हा दाखल 

marathinews24.com

पुणे – मोटारीत २ लाख रूपयांचे दागिने ठेवलेली पर्स चोरट्यांनी चोरून नेली आहे. ही घटना १० नोव्हेंबरला दुपारी पावणेएकच्या सुमारा वारजेतील अयंगर बेकरीजवळ घडली आहे. याप्रकरणी बाणेरमध्ये राहणार्‍या ४७ वर्षीय नागरिकाने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजनुसार चोरट्याचा माग काढला जात आहे.

कुख्यात गुंड नीलेश घायवळविरुद्ध तिसऱ्यांदा मोक्का कारवाई – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे बाणेरमध्ये राहायला असून, ते १० नोव्हेंबरला दुपारी पावणेएकच्या सुमारास वारजे माळवाडीतील अयंगर बेकरीत आले होते. त्यावेळी त्यांनी मोटार जवळच उभी केली होती. तक्रारदाराच्या पत्नीने मोटारीत स्वतःची पर्स ठेवली होती. त्यामध्ये दोन लाख रूपये किंमतीचे दागिने ठेवले होते. चोरट्यांनी मोटारीचा दरवाजा उघडून दागिने चोरून नेले. गाडीत बसल्यानंतर पर्स नसल्याचे दिसून आल्यानंतर संबंधिताने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक दीपाली लुगडे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×