Breking News
ऑस्ट्रेलियासह पुण्यातही मानसिक व शारीरिक त्रासाचा सामना…क्रांतिवीर चाफेकर बंधूचे स्मारक युवकांना देशभक्तीचे संस्कार देणारे केंद्र ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादनपुरस्कार विजेत्यांनी खेळाडूंना दिशा दाखवण्याचे काम करावे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसक्रीडासह विविध क्षेत्रात महाराष्ट्राने देशाचे नेतृत्व – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णनपिंपरी-चिंचवड; दारूच्या नशेत बरळला अन खुनाची उकल झाली !सावकरासोबत पत्नीचे झेंगाट जुळले…मांजरी बुद्रूक परिसरात घरफोडी, ५ लाखांचा ऐवज लंपासशेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिष, दोघांची ६२ लाखांची फसवणूकपुणे : वर्दळीच्या मार्केटयार्ड परिसरात वाहतूक बदलपिस्तुलासह काडतुस बाळगणार्‍या इसमास बेड्या

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय

राज्य सरकारच्या बैठकीत ७ महत्वपूर्ण निर्णयांवर शिक्कामोर्तब

Marathinews24.com

मुंबई – राज्य मंत्रिमंडळ बैठकीत विविध विभागांच्या 7 महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजूरी देण्यात आली. त्यामध्ये न्यायव्यवस्था बळकट करण्यापासून ते शैक्षणिक सुविधा वाढवण्यापर्यंतच्या मुद्द्यांचा समावेश आहे. त्यानुसार आता संबंधित विभागाच्या कामकाजाला गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संबंधित खात्याचे मंत्री उपस्थित होते.

ठाणे जिल्ह्यात नवीन न्यायालयाची स्थापना

चिखलोली-अंबरनाथ (ठाणे) येथे दिवाणी न्यायालय (कनिष्ठ स्तर न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग) स्थापन करण्याचा निर्णय. या न्यायालयासाठी आवश्यक पदे मंजूर करण्यात आली आहेत. तर कोठडीत मृत्यू झालेल्या कैद्यांच्या नातेवाइकांना भरपाई दिली जाणार आहे. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या सूचनेनुसार, कोठडीत मृत्यू झालेल्या कैद्यांच्या प्रकरणांत भरपाई देण्याच्या धोरणास मान्यता देण्यात आली. तसेच स्थावर मालमत्तांच्या हस्तांतरणासाठी नियमांमध्ये बदल नगरविकास विभागाच्या निर्णयानुसार, नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरीतील स्थावर मालमत्ता हस्तांतरण नियमांमध्ये सुधारणा केली जाणार आहे.

बातम्यांच्या दुनियेतून बाहेर पडताना; अरुण मेहेत्रे यांचा अखेरचा रिपोर्ट – सविस्तर बातमी

मालमत्ता कर वसुलीसाठी अभय योजना महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मध्ये सुधारणा करून मालमत्ता करावरील दंड अंशतः माफ करण्यासाठी विशेष अभय योजना लागू केली जाणार आहे. तर नगराध्यक्षांना हटवण्याच्या प्रक्रियेत सुधारणा. नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरीतील नगराध्यक्षांना बहुमताने हटवण्याची तरतूद करण्यात येणार असून, यासाठी अधिनियमात सुधारणा केली जाणार आहे.तसेच भूसंपादन मोबदल्याच्या व्याजदरांमध्ये सुधारणा ‘2013 चा उचित भरपाई आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम’ अंतर्गत, भूसंपादनाच्या मोबदल्याचा विलंब झाल्यास आकारण्यात येणाऱ्या व्याजदरांमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. तर लातूरमध्ये अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम सुरू पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन, लातूर येथे २०२५-२६ पासून अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top