विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली सुनावणी
Marathinews24.com
पुणे – सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून न्याय्य व तत्परतेने सोडवणूक करण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित लोकशाही दिनात तीन प्रकरणांवर सुनावणी घेण्यात आली. .यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, प्रभारी अपर आयुक्त अरुण आनंदकर, उपायुक्त दत्तात्रय लांघी, विविध विभागांचे विभागस्तरीय अधिकारी उपस्थित होते.
नागरिकांच्या तक्रारीवर निर्णय घेण्यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय लोकशाही दिनाचे विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजन करण्यात येते. जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रार निवारण झाले नाही अशा प्रलंबित दोन व नव्याने दाखल झालेल्या प्रकरणावर यावेळी डॉ.पुलकुंडवार यांनी अर्जदारांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देत सुनावणी घेतली. यात पुणे जिल्ह्यातील दोन व कोल्हापूर जिल्ह्यातील एका प्रकरणावर सुनावणी घेण्यात आली. महावितरणच्या बिलात दुरुस्ती, ट्रक चोरी प्रकरणी कार्यवाही होण्याबाबत तक्रारींवर सुनावणी घेतली.