Breking News
सरकार तुम्हाला अडचणींतून बाहेर काढण्यासाठी सक्षम; उपमुख्यमंत्री अजित पवारशेअर बाजारातील गुंतवणूक पडली २३ लाखांना…पुण्यातील पीएमपीएल बसप्रवास नको गं बाई, महिलांचे दागिने चोरणारी टोळी सुसाट…खाऊ घेऊन येत असताना चिमुरड्याला कारचालकाने चिरडले…खूनाच्या गुन्ह्यात तब्बल १४ वर्ष होता फरार, आरोपीला बेड्या…फिरता नारळी सप्ताह सांगता समारंभात मुख्यमंत्र्यांची हजेरी…वैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार, पुण्यातील बिबवेवाडीत घटनाहातबॉम्बची विक्री प्रकरण, आरोपीला कारावासची शिक्षा…पुण्यातील दोन महसूल अधिकार्‍यांविरोधात गुन्हा दाखल…धुमस्टाईल सोनसाखळी हिसकावणार्‍या दोघांना बेड्या

महिला आयोगाच्या सुनावणीत १२३ तक्रारींवर कार्यवाही…

१२३ तक्रारींवर महिला आयोगाची कारवाई; अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची माहिती

Marathinews24.com

पुणे – महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या “महिला आयोग आपल्या दारी” उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सुनावणीत पुणे शहरातील कौटुंबिक छळ, मालमत्ता आदी प्राप्त एकूण १२३ तक्रारींवर कार्यवाही केली आहे. अशी।माहिती आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिली. याबाबत १६ एप्रिलला पुणे ग्रामीणसाठी जिल्हाधिकारी कार्यालय आणि १७ एप्रिलला पिंपरी चिंचवड येथे जनसुनावणी होणार आहे.

पुणे जिल्ह्यातील विकास योजनेचा जिल्हाधिकाऱ्याकडून आढावा – सविस्तर बातमी

रूपाली चाकणकर यांनी मंगळवारी पुणे शहर विभागासाठी जनसुनावणी घेतली. महिलांना मुंबई येथील आयोगाच्या कार्यालयात येण्याची गरज भासू नये, त्यांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी आयोगाकडून सर्व संबंधित यंत्रणेसोबत जिल्हास्तरावर सुनावणी आयोजित केली आहे. यावेळी एकाच छताखाली पोलिस, प्रशासन उपस्थित असल्याने महिलांच्या तक्रारीवर त्याच ठिकाणी कार्यवाही करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील महिला व बालकांच्या प्रश्नांबाबत आढावा घेतला. यावेळी पोलिस, प्रशासन, महिला व बालविकास, कामगार, परिवहन, शिक्षण, आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या विभागांचे सादरीकरण करण्यात आले.जनसुनावणी आणि आढावा बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पोलिस उपायुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जिल्हा महिला बालविकास अधिकारी मनिषा बिरारीस उपस्थित होते.

स्व.तनिषा भिसे यांच्या मृत्यूनंतर महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने रुग्णालयासाठी मार्गदर्शक तत्वे असावीत अशी आयोगाची भूमिका होती. त्याबाबत उपसंचालक आरोग्य डॉ राधाकिसन पवार, ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ एकनाथ पवार यांनी आपला अहवाल आयोगास सादर केला. श्रीमती रूपाली चाकणकर यांनी, जनसुनावणी आणि आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देतांना एसओपीबाबत माहिती दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top