मद्यपान केल्यानंतर मित्राचीच चोरली चैन; आरोपीला अटक

डेक्कन नदीपात्रात तरुणाला धमकावून लुटणारे गजाआड

आरोपीला चंदननगर पोलिसांनी केली अटक

marathinews24.com

पुणे – एकत्रितपणे मद्यपान केल्यानंतर मित्रानेच १ लाख ४० हजारांची सोन्याची चैन चोरून नेली. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी संबंधिताला अटक केली आहे. ही घटना २० नोव्हेंबरला रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास चंदननगरमधील गणेशनगरात घडली होती. स्वप्नील बळीराम बनसोडे (वय २२ रा. माने वस्ती, केसनंद) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

रोकडसह मोबाइल अन दुचाकीची केली चोरी – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि आरोपी स्वप्नील बनसोडे हे मित्र असून, २० नोव्हेंबरला दोघांनी मद्यपान केले होते. त्यानंतर तक्रारदार नशेत असल्याची संधी साधून आरोपी स्वप्नीलने त्याच्या गळ्यातील १ लाख ४० हजारांची सोन्याची चैन चोरून नेली. याप्रकरणी माहिती झाल्यानंतर तक्रारदाराने पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. सहायक पोलीस निरीक्षक साळवे तपास करीत आहेत.

बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीला

पुणे – पीएमपीएल बसप्रवासात गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी ६७ वर्षीय महिलेच्या हातातील १ लाख रूपये किंमतीची सोन्याची बांगडी कापून नेली. ही घटना १ डिसेंबरला संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास येरवडा बसस्थानक ते गुंजन चौकादरम्यान घडली आहे. याप्रकरणी वडगाव शेरीतील महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ महिला वडगाव शेरीत राहायला असून, १ डिसेंबरला संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास येरवडा बसस्थानक ते गुंजन चौक असा पीएमपीएल बसप्रवास करीत होती. त्यावेळी बसमधील गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या हातातील १ लाख रूपये सोन्याची बांगडी कापून नेली. बसमधून उतरल्यानंतर महिलेला चोरी झाल्याचे दिसून आले. महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस अमलदार शिंदे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×