Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

दुचाकी विक्री दालनातून रोकड चोरी

दुचाकी विक्री दालनातून रोकड चोरी

चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

maratinews24.com

पुणे – दुचाकी विक्री दालनाचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी ५० हजारांची रोकड लांबविल्याची घटना डेक्कन जिमखाना भागातील भांडारकर रस्त्यावर घडली. याबाबत दुचाकी विक्री दालनातील व्यवस्थापकांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भांडारकर रस्त्यावर दुचाकी विक्री दालन आहे. रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. चोरट्यांनी तिजोरी उचकटून ५० हजारांची रोकड चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तेथे भेट दिली. पोलिसांनी दुचाकी विक्री दालनातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासले असून, पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×