Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

Pune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटले

केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील घटना

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – सोशल माध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील रोहन गलांडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने भीमा कोरेगाव येथील १ जानेवारी रोजी शौर्य दिनाच्या निमित्ताने स्टेटस ठेवले होते. त्याच्या मोबाईलच्या इंस्टाग्राम अकाउंटच्या स्टेटसला भीमा कोरेगाव येथील शौर्य दिनाच्या निमित्ताने एका समाजाच्या भावना भडकाविण्याच्या वाईट उद्देशाने आक्षेपार्ह मजकूर व्हायरल केला होता.

जीएसटी घोटाळ्यात बीडच्या दोघांना बेड्या – सविस्तर बातमी

केज येथील दलीत चळवळीतील विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे बीड जिल्हाध्यक्ष योगेशभाई गायकवाड, लखन हजारे, निलेश साखरे, बाळासाहेब ओव्हाळ, अशोक गायकवाड, तात्या गवळी, प्रदीप गायकवाड, गौतम बचुटे, समाधान बचुटे, बाबुराव गालफाडे, लिंबराज गायकवाड, समाधान बचुटे आणि दलीत चळवळीतील कार्यकर्त्यानी पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांची भेट घेतली. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली. स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे बीड जिल्हाध्यक्ष योगेशभाई गायकवाड यांच्या फिर्यादीवरून रोहन गलांडे याच्याविरुद्ध केज पोलिस ठाण्यात गु. र. नं. ०७/२०२६ भा. न्या. सं. १८६(१), २९९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस मुरकुटे हे तपास करीत आहेत.

सोशल मीडियावर आक्षेपार्ह किंवा सामाजिक सलोखा बिघडविण्याच्या उद्देशाने पोस्ट व्हायरल केल्यास कठोर कारवाई कारवाई केली जाईल. – स्वप्नील उनवणे, पोलिस निरीक्षक, केज

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×