Breking News
पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाटावरील कार्यालयात आगपुण्यात सिमेंट मिक्सर’वाहतुकीला दोन दिवस सवलतशोभाताईंच्या कवितांमधून सकारात्मक स्त्रीजीवनाचे प्रातिनिधिक दर्शन घडतेआषाढी वारी २०२६ दरम्यान एलपीजी सुरक्षा जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद‘तारपा’साठीच आमची वंशावळ-भिकल्या लाडक्या धिंडा यांची भावनापुणे जिल्ह्यातील दोन सराईत टोळ्यांविरुद्ध मोक्कापोलीस असल्याचे सांगून महाविद्यालयीन तरूणाला मारहाणजनगणनेनंतरच अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनाडिजीटल अटक करण्याची भीती, जेष्ठाला ११ लाखांचा गंडा

गॅस पुरवठा खंडीत करण्याची भीती दाखवून फसवणूक

Pune Cyber Fraud

सायबर चोरट्यांविरुद्ध चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – गॅस पुरवठा खंडीत करण्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी एकाच्या बँक खात्यातून ३ लाख ८० हजारांची रोकड लांबविल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ४८ वर्षीय तक्रारदार हे ओैंधमधील डीपी रस्त्यावरील एका सोसायटीत राहायला आहेत.

तरुणाला विवस्त्र करुन मारहाण – सविस्तर बातमी 

सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर काही दिवसांपूर्वी संपर्क साधला होता. खासगी गॅस पुरवठा करणाऱ्या कंपनीतून बोलत असल्याची बतावणी केली. थकित देयक न भरल्यास गॅस पुरवठा तातडीने खंडीत करण्यात येईल, अशी भीती चोरट्यांनी त्यांना दाखविली. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्याची माहिती घेतली. या माहितीचा गैरवापर करुन चोरट्यांनी बँक खात्यातून तीन लाख ८० हजार रुपये लांबविले. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक अश्विनी ननावरे तपास करत आहेत. गॅस पुरवठा, वीज पुरवठा खंडीत करण्याची भीती दाखवून फसवणूक करण्याच्या घटना शहरात वाढीस लागल्या आहेत. नागरिकांनी चोरट्यांच्या बतावणीकडे दुर्लक्ष करावे. खातरजमा करुन देयक भरणा करण्याबाबतचे व्यवहार करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×