Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

तरुणाला विवस्त्र करुन मारहाण

तरुणाला विवस्त्र करुन मारहाण

पिस्तुलातून गोळी झाडून खुनाचा प्रयत्न

marathinews24.com

पुणे – आर्थिक वादातून तरुणाला विवस्त्र करुन त्याला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना कात्रज-कोंढवा रस्त्यावर घडली. मारहाण करणाऱ्या आरोपींनी मोबाइलवरुन तरुणाचे चित्रीकरण केले , तसेच पोलिसांकडे तक्रार दिल्यास जीवे मारण्यााची धमकी देऊन त्याच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला. याप्रकरणी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

दुचाकी विक्री दालनातून रोकड चोरी – सविस्तर बातमी 

आयुष कामठे, अभि म्हस्के, अभि पाटील, मंगेश माने, कौशल उर्फ ऋषी मोरे यांच्यासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणाने येवलेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ३१ वर्षीय तरुण वाहन खरेदी – विक्री व्यवसाय करतो. तो कोंढवा भागात राहायला आहे. आरोपी तरुणाच्या ओळखीचे आहेत. आर्थिक वादातून आरोपींनी ३१ डिसेंबर रोजी तरुणाला मारहाण करुन त्याचे मोटारीतून अपहरण केले. रात्री अकराच्या सुमारास कात्रज-कोंढवा रस्त्यावरील गोकुळनगर परिसरात असलेल्या मोकळ्या मैदानात आरोपी तरुणाला घेऊन गेले. तरुणाला विवस्त्र करुन आरोपींनी बेदम मारहाण केली. त्यांतर तरुणाचे मोबाइलवरुन चित्रीकरण केले. त्याला शिवीगाळ करुन चित्रफीत समाजमाध्यमात प्रसारित करण्याची धमकी दिली.

आरोपी मंगेश माने याने मोटारीत ठेवलेल्या पिस्तुलाचा धाक तरुणला दाखविला. त्यानंतर पोलिसांकडे तक्रार दिल्यास जीवे मारु, अशी धमकी दिली. तरुणावर गोळीबार केला. या घटनेनंतर तरुण घाबरला होता. त्याने रविवारी पोलिसांकडे तक्रार दिली. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर काळंगे यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक खराडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×