Breking News
जिल्ह्याच्या विकासाच्यादृष्टीने माहितीचा संग्रह निर्मितीसाठी स्व-गणना महत्वपूर्ण-अपर जिल्हाधिकारी सतीश राऊतमहापौर रवि लांडगे यांचा स्वगणनेतून जनगणना २०२७ मोहिमेला शुभारंभबारामती पोटनिवडणूक मतमोजणी ४ मे रोजी; प्रशासनाची जय्यत तयारीमुंबई-पुणे प्रवासातील वाहतूक कोंडी फुटली; ‘मिसिंग लिंक’ म्हणजे आधुनिक अभियांत्रिकीचा चमत्कारहुतात्मा स्मारकाला उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे अभिवादनमिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रमबाह्यवळण मार्गावर कंटेनरवर मोटार आदळून एकाचा मृत्यूखराडीत दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूसिंहगड किल्ल्यावरुन उडी मारुन तरुणीची आत्महत्याप्रेमप्रकरणातून तरुणीचा ब्लेडने गळा चिरला

हडपसरमधील सराफी पेढीवर भरदिवसा दरोडा

हडपसरमधील सराफी पेढीवर भरदिवसा दरोडा

५२ लाखांचे दागिने लुटले

marathinews24.com

पुणे – शहरातील हडपसरमधील शेवाळवाडी भागात भरदिवसा सराफी पेढीवर दरोडा टाकण्यात आल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. चोरट्यांनी शस्त्राच्या धाकाने ५२ लाखांचे दागिने लुटून नेले. याबाबत सराफ व्यावसियाक महेद्रसिंह सोलंकी (वय ३७) यांनी मांजरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पाच चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्येष्ठ महिलेच्या बँक खात्यातून साडेदहा लाख रुपये केले गायब – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर महामार्गावर साेलंकी यांची महावीर ज्वेलर्स सराफी पेढी आहे. शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास साेलंकी सराफी पेढीत एकटेच होते. त्या वेळी खरेदीच्या बहाण्याने चौघे जण सराफी पेढीत शिरले. त्यांच्याबरोबर असलेला एक जण सराफी पेढीबाहेर थांबला होता. चोरट्यांनी साेलंकी यांना कोयत्याचा धाक दाखविला. आरडाओरडा केला तर, जीवे मारू अशी धमकी चोरट्यांनी त्यांना दिली. चोरट्यांनी सराफी पेढीतील दागिने पिशवीत भरले. दाागिने लुटून चोरटे दुचाकीवरुन पसार झाले.
या घटनेची माहिती मिळताच मांजरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब निकम यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी सराफी पेढीतील चित्रीकरण तपासले असून, पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे.

आठवड्यापूर्वी खडकवासला-पानशेत रस्त्यावरील खानापूर येथील एका सराफी पेढीवर भरदिवसा दरोडा टाकून चोरट्यांनी सव्वा कोटींचे दागिने लुटण्यात आल्याची घटना घडली होती. याप्रकरणी ग्रामीाण पोलिसांच्या गुन्हे शाखेने पसार झालेल्या दोन चोरट्यांसह त्यांच्याबराेबर असलेल्या अल्पवयीनाला पकडले होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×