Breking News
जिल्ह्याच्या विकासाच्यादृष्टीने माहितीचा संग्रह निर्मितीसाठी स्व-गणना महत्वपूर्ण-अपर जिल्हाधिकारी सतीश राऊतमहापौर रवि लांडगे यांचा स्वगणनेतून जनगणना २०२७ मोहिमेला शुभारंभबारामती पोटनिवडणूक मतमोजणी ४ मे रोजी; प्रशासनाची जय्यत तयारीमुंबई-पुणे प्रवासातील वाहतूक कोंडी फुटली; ‘मिसिंग लिंक’ म्हणजे आधुनिक अभियांत्रिकीचा चमत्कारहुतात्मा स्मारकाला उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे अभिवादनमिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रमबाह्यवळण मार्गावर कंटेनरवर मोटार आदळून एकाचा मृत्यूखराडीत दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूसिंहगड किल्ल्यावरुन उडी मारुन तरुणीची आत्महत्याप्रेमप्रकरणातून तरुणीचा ब्लेडने गळा चिरला

फलोत्पादन मंत्र्यांची स्ट्रॉबेरी शेताला भेट

फलोत्पादन मंत्र्यांची स्ट्रॉबेरी शेताला भेट

रोजगार हमी व खारभूमी विकास मंत्री भरतशेठ गोगावले केली स्ट्रॉबेरी शेतीची पाहणी

marathinews24.com

पुणे – राज्याचे फलोत्पादन, रोजगार हमी व खारभूमी विकास मंत्री भरतशेठ गोगावले यांनी वाई तालुक्यातील ओझर्डे गावात स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी महादेव कोळी व परशुराम बिराजदार यांच्या शेताला भेट देऊन प्रत्यक्ष स्ट्रॉबेरी शेतीची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्ट्रॉबेरी लागवडीची पद्धत, रोपवाटिका व्यवस्थापन, उत्पादन क्षमता, बाजारपेठ, खर्च–उत्पन्नाचे गणित तसेच शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणींबाबत सविस्तर माहिती घेतली.

खेलो इंडिया बीच कबड्डीत महाराष्ट्राची धडाकेबाज सलामी – सविस्तर बातमी 

स्ट्रॉबेरीसारखी उच्च मूल्य पिके शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे नमूद करून मंत्री गोगावले यांनी फलोत्पादन विभागामार्फत आवश्यक ते सर्व सहकार्य शेतकऱ्यांना दिले जाईल, असे आश्वासन दिले. ओझर्डे परिसरात स्ट्रॉबेरी लागवड यशस्वी ठरत असल्याचे सांगत आधुनिक तंत्रज्ञान, ठिबक सिंचन प्रणाली तसेच सुधारित रोपांचा वापर करणाऱ्या तरुण शेतकऱ्यांचे त्यांनी विशेष कौतुक केले.

महाबळेश्वरसह वाई, कोरेगाव व जावळी तालुक्यांचा परिसर स्ट्रॉबेरी व फलोत्पादनासाठी अत्यंत पोषक असून, स्ट्रॉबेरी, फळबागा तसेच प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी ‘स्मार्ट’ व पीएमएफई (PM-FME) योजनेअंतर्गत प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे मंत्री गोगावले यांनी सांगितले. याप्रसंगी प्रगतीशील शेतकरी सागर फाटक यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×