Breking News
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापर

मुख्याध्यापकासह दोन शिक्षक जिल्हा शिक्षक पुरस्काराने सन्मानित

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते गौरव

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून गुणवंत विद्यार्थी घडवणाऱ्या केज तालुक्यातील मस्साजोगमधील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकसह दोन शिक्षकांचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव करण्यात आला. हा पुरस्कार गुरुवारी ( दि.१) सोहळा बीड शहरातील संभाजी महाराज क्रीडा संकुलात पार पडला.

स्वयंसहाय्यता समूहांना बँक कर्जपुरवठ्यास गती देण्यासाठी जिल्हास्तरीय बँक व्यवस्थापक प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न – सविस्तर बातमी

उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस , आमदार विक्रम काळे, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार विजयसिंह पंडित, जिल्हाधिकारी विवेक जॅान्सन, मुख्य कार्यकारी अधिकारी जितिन रेहमान यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार सोहळा पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मुख्याध्यापक रंगनाथ कोथिंबीरे ,शिक्षक प्रशांत जाधव, पुष्पा बनसोडे यांना जिल्हा प्रशासनाकडून सत्कार करण्यात आला. शिक्षक म्हणून शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावून, निपूण महाराष्ट्र अंतर्गत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यात मोलाचे योगदान दिले आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे कार्य, निष्ठा, मेहनत व कर्तृत्व लक्षात घेता त्यांना सन २०२४ जिल्हा शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे.असे आशयाचे कौतुकाची पावती असलेली सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

मस्साजोग जि.प शाळेतील पुरस्कार्थी असलेल्या सर्व शिक्षकांचे सरपंच वर्षा आनंद सोनवणे,धनंजय देशमुख, अध्यक्ष श्रीकांत सोनवणे, पत्रकार अनंत जाधव यांच्यासह सर्व शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि सर्व शिक्षक मित्र परिवाराकडून आणि नातेवाईकांकडून कौतुक होत आहे.

शासनाने माझ्या कार्याची दखल घेऊन केलेला सन्मान माझ्यासाठी खूप मोलाचा व प्रेरणादायी आहे. माझ्या ज्ञानदानाचे हे कार्य मी अविरतपणे आणि उत्स्फूर्तपणे असेच करत राहील. व विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासामध्ये रंग व कलेच्या माध्यमातून भर घालत राहीन. – प्रशांत जाधव, शिक्षक

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×