Breking News
जिल्ह्याच्या विकासाच्यादृष्टीने माहितीचा संग्रह निर्मितीसाठी स्व-गणना महत्वपूर्ण-अपर जिल्हाधिकारी सतीश राऊतमहापौर रवि लांडगे यांचा स्वगणनेतून जनगणना २०२७ मोहिमेला शुभारंभबारामती पोटनिवडणूक मतमोजणी ४ मे रोजी; प्रशासनाची जय्यत तयारीमुंबई-पुणे प्रवासातील वाहतूक कोंडी फुटली; ‘मिसिंग लिंक’ म्हणजे आधुनिक अभियांत्रिकीचा चमत्कारहुतात्मा स्मारकाला उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे अभिवादनमिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रमबाह्यवळण मार्गावर कंटेनरवर मोटार आदळून एकाचा मृत्यूखराडीत दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूसिंहगड किल्ल्यावरुन उडी मारुन तरुणीची आत्महत्याप्रेमप्रकरणातून तरुणीचा ब्लेडने गळा चिरला

लातूर जिल्ह्यात दलित विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

चौकशीच्या मागणीसाठी दलीत मातंग संघर्ष समितीचा आंदोलनाचा इशारा

marathinews24.com

बीड (अनंत जाधव)- लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील जवाहर नवोदय विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या दलित मातंग समाजातील अल्पवयीन विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. वसतिगृहात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून दलित समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. घटनेप्रकरणी सकल दलित(मातंग) समाज कृती समितीच्यावतीने केज तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.

बनावट ट्रस्टच्या नावाखाली कोट्यवधींचा घोटाळा – सविस्तर बातमी

विद्यार्थिनीचा मृत्यू आत्महत्येचा नसून संशयास्पद असल्याचा आरोप करण्यात आला आहे.मृत विद्यार्थिनीला यापूर्वी शाळेतील काही कर्मचाऱ्यांकडून त्रास दिला जात असल्याचे आरोप करण्यात आला असून, याप्रकरणी सखोल व निष्पक्ष चौकशीची मागणी करण्यात आली आहे.घटनेनंतर प्रशासनाकडून अद्याप समाधानकारक माहिती देण्यात आलेली नाही. संबंधित विद्यालयातील जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यां वर तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. विद्यार्थिनीच्या मृत्यू मागील सत्य बाहेर येण्यासाठी सीबीआय मार्फत चौकशी करावी, अशी मागणी समाज कृती समितीने केली आहे. दरम्यान, जर येत्या सहा दिवसांत योग्य ती चौकशी व कारवाई झाली नाही,तर केज शहर बंद ठेवून तसेच रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दलित समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.या घटनेमुळे जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यावेळी दलीत मातंग समाजातील युवक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×