पुण्यात नायजेरियन नागरिकाचा खून, दोघे ताब्यात

पुण्यात नायजेरियन नागरिकाचा खून, दोघे ताब्यात

प्रेमप्रकरणातून टोळक्याने केली हत्या

marathinews24.com

पुणे – प्रेमप्रकरणाच्या रागातून नायजेरियन टोळक्याने मिळून मित्रालाच बेदम मारहाण करून त्याचा खून केला आहे. ही धक्कादायक घटना १२ जानेवारीला पिसोळीतील पद्मावतीनगरात घडली आहे. याप्रकरणी काळेपडळ पोलिसांनी दोघा हल्लेखोरांना ताब्यात घेतले आहे. येमेका क्रिस्टीएन ( वय ४० रा. फुरसुंगी, मूळ रा. नायजेरिया) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी नायेमेका मदुबची ओनिओ आणि किन्सली ओबा (दोघेही रा. लिमरास हाईट सोसायटी, पद्मावतीनगर, पिसोळी, मूळ- नायजेरिया) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. इतरांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुख्यात गुंड गजा मारणेला उच्च न्यायालयाचा दिलासा – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिसोळी परिसरातील बालाजी पद्मावतीनगरात नायजेरियन महिला एनकेनिया पेंट्रिशिया मबिगा राहायला आहे. सोमवारी (दि. १२) सकाळच्या सुमारास तिने काही मित्रांना घरी जेवायला बोलावले होते. त्यामुळे येमेका क्रिस्टीएन, किन्सली, ओबी, ओजे ओजगवा, नायेमेका मादूबुची ओनिया हे मिळून जेवणसाठी गेले होते. त्याठिकाणी प्रेम प्रकरणाच्या कारणावरून येमेका क्रिस्टीएन याचे नायेमेका मदुबची ओनिय, किन्सली, ओबी, ओजे ओजगवा यांच्याशी भांडण झाले.

रागातून किन्सली, ओबी, नायेमेका मादूबुची ओनिया, ओजे ओजगवा यांनी मिळून क्रिस्टीएनच्या डोक्यात, हातावर, पायावर बेदम मारहाण केली. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या क्रिस्टीएनला त्याचा मित्र गिफ्ट सिव्होनस ऊटाह (वय ३९रा. वडाची वाडी, उंड्री ता. हवेली) याने वानवडीतील रूबी हॉलमध्ये दाखल केले. उपचारादरम्यान जखमी क्रिस्टीएनचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्यासह पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी ओनिओ आणि ओबी यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×