पुणे ग्रँड चॅलेंज टूर’निमित्त दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त

वाहतूक नियोजनाच्या अनुषंगाने पोलीस बंदोबस्त

marathinews24.com

पुणे – पुणे ग्रँड चॅलेंज टूर २०२६’ अंतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या प्रोलॉग सायकल स्पर्धेच्या निमित्ताने साेमवारी (दि.१९ ) पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला. स्पर्धा सुरळीत पार पाडणे, तसेच वाहतूक नियोजनाच्या अनुषंगाने स्पर्धेच्या मार्गावर दीड हजार पोलीस तैनात राहणार आहेत.

पुणे ग्रँड चॅलेंज टूर-२०२६ पिंपरी-चिंचवड शहरात सायकल स्पर्धा मार्गावरील सर्व शाळांना सुट्टी जाहीर – सविस्तर बातमी

पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. चार अतिरिक्त पोलीस आयुक्त, १० पोलीस उपायुक्त, वरिष्ठ अधिकाऱ्यांसह दीड हजार पोलीस कर्मचारी बंदोबस्तास तैनात करण्यात आला आहे. स्पर्धेच्या मार्गावर गुन्हे शाखा, विशेष शाखेतील पथके तैनात राहणार आहेत. बाँम्बशोधक नाशक पथक (बीडीडीएस), शीघ्र कृती दल (क्विक रिस्पाॅन्स टीम), सर्वेलन्स व्हेईकल ‘दृष्टी’ अशी पथके तैनात राहणार आहेत.

शहरातील मध्यभागातील प्रमुख रस्त्यावरील वाहतूक सकाळी नऊ ते सायंकाळी सहा यावेळेत बंद ठेवण्यात येणार आहे. नामदार गोपाळ कृष्ण गाेखले रस्ता (फर्ग्युसन रस्ता), जंगली महाराज रस्त्यासह मध्यभागातील प्रमुख ऱस्ते, उपरस्ते वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. वाहन चालकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×