Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

कै. अजितदादा पवार यांच्या निधनाने राज्यावर शोककळा; सुनेत्राताई पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ

“हा आनंदाचा नव्हे, कर्तव्याचा क्षण; सुनेत्राताई पवार यांची भूमिका धैर्याची”– उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई – कैलासवासी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी आणि न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या जाण्याने पवार कुटुंबावरच नव्हे, तर संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली असल्याची भावना विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली आहे.

ग्रंथभेट योजनेसाठी प्रकाशित ग्रंथ सादर करण्याचे आवाहन – सविस्तर बातमी

या अत्यंत कठीण आणि वेदनादायी काळात, अजितदादांच्या पत्नी श्रीमती सुनेत्राताई पवार यांनी आज खासदारकीचा राजीनामा देत लोकभवन, मुंबई येथे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. हा प्रसंग कोणत्याही अर्थाने आनंदाचा नसून, तो जबाबदारीचा, कर्तव्याचा आणि सेवाभावाचा असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.

वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून राज्याच्या हितासाठी पुढे येणे हे मोठ्या धैर्याचे आणि मानसिक बळाचे द्योतक आहे. कैलासवासी अजितदादांच्या कार्याचा, विचारांचा आणि जनसेवेचा वारसा पुढे नेण्याची महत्त्वाची जबाबदारी आता सुनेत्राताई पवार यांच्यावर आली असल्याचेही त्यांनी नमूद केले.

कैलासवासी अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना, सौ. सुनेत्राताई पवार यांना पुढील वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा देत, ईश्वर त्यांना हे दायित्व पेलण्याची शक्ती देवो, अशी भावना विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×