Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

पुण्यात चक्क ट्राफिक सिग्नलमधील बॅटर्‍याच चोरल्या

Pune Crime News

दोघांना येरवडा पोलिसांनी केली अटक

marathinews24.com

पुणे – पोलिसांच्या नाकावर टिच्चून येरवडा परिसरात चोरट्यांनी चक्क ट्राफिक सिग्नल कंटोलमधील बॅटर्‍याच चोरून नेल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे चोरट्यांना आता पोलिसांचीही भीती राहिली नसल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणी संबंधित टोळक्याला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना १८ ते २६ नोव्हेंबर कालावधीत कल्याणीनगर ते बदामी चौक येरवडा दरम्यान घडली.

रपेट मारण्याची बतावणी करुन दुचाकीसह चोरटा पसार – सविस्तर बातमी

सनी गणपत शिंदे (वय ३५, रा. भवानी पेठ, मूळ-वानवडी) सोमनाथ चंद्रकांत दाभाडे (वय २९, रा. वैदवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील वाहतूक सुरळित ठेवण्यासाठी महानगरपालिकेकडून सिग्नल यंत्रणा बसवली जाते. त्याचे नियमन वाहतूक विभागाकडून केले जाते. विशेषतः अत्याधुनिक ट्राफिक सिग्नलमधील कंट्रोलमधील बॅटर्‍यांद्वारे परिसरातील वाहतूक नियमित केली जाते. दरम्यान, संबंधित बॉक्सला सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना नसल्याचे चोरट्यांनी हेरले. त्यानंतर १८ ते २६ नोव्हेंबर कालावधीत तब्बल ८१ हजार रूपये किंमतीच्या २७ बॅटर्‍या चोरून नेल्या. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार संबंधित टोळक्याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक गणेश राठोड तपास करीत आहेत.

म्हणून चोरल्या ट्राफिक कंट्रोलरमधील बॅटर्‍या

ट्राफिक सिग्नल कंट्रोलरमध्ये बॅटर्‍या सहजासहजी बाजूला करता येउ शकतात, याचा माहिती चोरट्यांना होती. त्यामुळे रात्रीच्या सुमारास त्यांनी येरवडा परिसरातील कल्याणीनगर ते बदामी चौकदरम्यान असलेल्या कंट्रोलरमधील २७ बॅटर्‍या चोरून नेल्या. दरम्यान, संबंधित परिसरातील वाहतूक यंत्रणा अनियंत्रित झाल्यानंतर वाहतूक विभागाने धाव घेत तपासणी केली. त्यावेळी कंटोलरमधील बॅटर्‍या चोरीला गेल्याचे दिसून आले. त्यानंतर येरवडा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा माग काढून त्यांना बेड्या ठोकल्या आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×