Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

आरोग्य क्षेत्राला भक्कम बळ देणारा अर्थसंकल्प : डॉ. राजेश देशपांडे

कर्करोग व दुर्मिळ आजारांवरील औषधे स्वस्त होणार; संशोधनाला मोठी चालना

marathinews24.com

पुणे – केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ मध्ये आरोग्य क्षेत्राला भक्कम चालना देण्यात आली असून, कर्करोगावरील औषधे आणि दुर्मिळ आजारांवरील औषधे स्वस्त करण्यासाठी आयात शुल्क रद्द करण्याचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे, अशी प्रतिक्रिया बाणेर-बालेवाडी मेडिको असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजेश देशपांडे यांनी दिली.

भारताच्या विकासगतीला चालना देणारा अर्थसंकल्प : ऐश्वर्या पठारे – सविस्तर बातमी

डॉ. देशपांडे यांनी सांगितले की, संशोधन, लस विकास आणि जैव-निर्मिती क्षेत्र मजबूत करण्यासाठी जाहीर करण्यात आलेला १० हजार कोटी रुपयांचा ‘बायोफार्मा शक्ती’ कार्यक्रम भारताच्या आरोग्य व्यवस्थेसाठी मैलाचा दगड ठरेल. याशिवाय, देशभरात पाच प्रादेशिक मेडिकल टुरिझम हब उभारण्याची घोषणा करण्यात आली असून, आयुर्वेद व पारंपरिक उपचारपद्धतींना अधिक पाठबळ देण्यात आले आहे. रुग्णसेवा अधिक सक्षम करण्यासाठी केअरगिव्हर्स, तंत्रज्ञ आणि संलग्न आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कौशल्यविकासावरही अर्थसंकल्पात विशेष भर देण्यात आला आहे. एकूणच हा अर्थसंकल्प परवडणारे उपचार, सक्षम आरोग्य पायाभूत सुविधा आणि भारताला जागतिक आरोग्य केंद्र म्हणून उभे करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरेल, असा विश्वास डॉ. देशपांडे यांनी व्यक्त केला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×