Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

शीतल तेजवाणी विरोधात १ हजार ८८६ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पुण्यातील जमीन घोटाळा; शीतल तेजवाणीला अटक

मुंढवा शासकीय जमीन विक्री प्रकरण – सुर्यकांत येवले, दिग्विजय पाटील यांच्यासह इतरांचा तपास

marathinews24.com

पुणे – शहरातील मुंढवा परिसरातील शासकीय जमिनीच्या बेकायदेशीर विक्री प्रकरणात मुख्य आरोपी शीतल तेजवाणी हिच्याविरोधात पोलिसांनी तब्बल १ हजार ८८६ पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या संकेतस्थळावर ‘बिझीनेस प्रोमोशन’ टॅब उपलब्ध – सविस्तर बातमी

मुंढव्यातील कोट्यावधी रूपयांची ४० एकर शासकीय जमीन अमेडिया कंपनीला ३०० कोटी रुपयांना विक्री प्रकरणात निलंबित तहसीलदार सुर्यकांत येवले, हेमंत गवंडे, दिग्वीजय पाटील, शीतल तेजवाणी यांच्यासह इतरांवर गुन्हा नोंद केला होता. पुण्यातील खडक पोलिस ठाण्यात हा गुन्हा नोंद केला होता. संबंधित गुन्ह्याचा तपास पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. तपासानुसार पोलिसांनी शीतल तेजवाणी हिला ३ डिसेंबर २०२५ रोजी अटक केली. याप्रकरणातील प्रमुख सूत्रधार तेजवाणी असल्याचेही उघडकीस आले होते.

वारसदारांकडून पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी करून घेत तेजवाणीने त्यातील काही वारसदारांना धनादेश वितरित केले होते. त्यानंतर जमीनीची विक्री अमेडिया कंपनीला केली होती. त्यानंतर तिला याप्रकरणी अटक केली होती. पोलिसांनी वारसदार तसेच इतर आरोपींचे जबाब नोंदवून त्यांच्याकडे प्राथमिक चौकशी केली होती. दरम्यान तेजवाणीच्या अटकेला मंगळवारी ६० दिवस पुर्ण होण्याआधी २७ जानेवारीलाच पोलिसांनी न्यायालयात दोषारोरपत्र दाखल केले आहे.

इतर आरोपींकडे तपास अद्याप सुरू

न्यायालयात सादर केलेल्या दोषारोपपत्रानुसार सर्व आरोपींची भूमिका स्पष्ट झालेली नाही. निलंबित तहसीलदार सुर्यकांत येवले व दिग्विजय पाटील यांच्यासह इतर काही संशयितांचा तपास सुरू असल्याचे नमूद केले आहे. आवश्यक पुरावे आणि कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर पुरवणी दोषारोपपत्र दाखल केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

बोपोडी प्रकरणाचाही उल्लेख

मुंढवा जमीन विक्री प्रकरणातच हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, बोपोडीतील शासकीय जमीन प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून नमूद करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×