अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या संकेतस्थळावर ‘बिझीनेस प्रोमोशन’ टॅब उपलब्ध

अण्णासाहेब पाटील महामंडळाचा मोठा निर्णय...

लाभार्थ्यांना व्यवसायाची माहिती ऑनलाईन अपलोड करण्याची सुविधा

marathinews24.com

पुणे – अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या www.udyog.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर व्यवसाय वृद्धी (बिझीनेस प्रोमोशन) स्वतंत्र टॅब उपलब्ध करून देण्यात आला आहे. लाभाथ्यांनी या सुविधांचा लाभ घेऊन आपली आवश्यक माहिती संकेतस्थळावर अपलोड करावी, असे आवाहन महामंडळामार्फत करण्यात आले आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २३ हजार मनुष्यबळाची नियुक्ती-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी – सविस्तर बातमी

या सुविधेअंतर्गत लाभार्थ्यांना आपली सेवा, उत्पादने, त्यांची किंमत तसेच वैशिष्ट्यासह व्यवसायाशी संबंधित सविस्तर माहिती पोर्टलवर अपलोड करता येणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना व्यवसायाचे नाव, व्यवसायाचा प्रकार, उत्पादने अथवा सेवा, किमती, वैशिष्टे, संपर्क तपशील व इतर आवश्यक माहिती संकेतस्थळावर नोंदविता येणार आहे. या सुविधामुळे लाभार्थ्यांच्या व्यवसायाला व्यापक प्रचार व प्रसिद्धी मिळणार असून त्यांची उत्पादने व सेवा थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. या उपक्रमामुळे लाभार्थ्यांच्या व्यवसायाचा विस्तार होण्यास चालना मिळेल, स्थानिक उत्पादने व सेवा ग्राहकता ह उपलब्ध होतील तसेच महामंडळाच्या लाभार्थ्यांना आर्थिकदृष्टया अधिक सक्षम होण्यास मदत होईल.

अधिक माहितीकरिता सचिन खोजे, जिल्हा समन्वयक (9921755743), ज़िल्हा कौश्यल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रास्ता पेठ, पुणे यांच्याशी संपर्क साधावा.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×