Breking News
Mukhyamantri Gramin Pashudhan Yojana : मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसाठी लवकरच ऑनलाइन अर्जCarl Ross Filmmaking : साचेबद्धपणा टाळून चित्रपट निर्मिती करा-कार्ल रॉसSenior Citizen Health Camp : सामाजिक न्याय भवन येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिरBlood Donation Campaign : सेवा संकल्प अभियानातून ‘रक्तदानाचा संकल्प’; पुणे जिल्ह्यात जीवनदानाची चळवळPune Police Suicide : पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाची गोळी झाडून आत्महत्याPune Crime Branch : पुण्यात एक वर्षापासून फरार आरोपीला अटकVishrantwadi Crime : दुचाकी पार्किंगचा वाद कोयते उगारण्यावरMobile Banking Fraud : मोबाइल बँकिंगचा घेतला ताबा, १० लाखांचा गंडाPune Graduate Teacher Election : पुणे विभाग पदवीधर, शिक्षक द्विवार्षिक निवडणूक- २०२६; जिल्हास्तरीय माध्यम संनियंत्रण आणि प्रमाणीकरण समिती कार्यान्वितBajaj Pune Grand Tour : बजाज पुणे ग्रँड टूरला UCI 2.1 श्रेणी; २६ ते ३१ जानेवारीदरम्यान सहा टप्प्यांची स्पर्धा

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २३ हजार मनुष्यबळाची नियुक्ती

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

marathinews24.com

पुणे – जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ च्या कामकाजाकरिता जिल्ह्यात १३ तालुक्यात एकूण २३ हजार ११४ मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.

रस्ता सुरक्षा जनजागृती व प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न – सविस्तर बातमी

बारामती तालुक्यात १ हजार ९४५, मावळ १ हजार ६१२, मुळशी १ हजार ४९५, शिरुर २ हजार १९०, हवेली १ हजार ८००, दौंड २ हजार ६० , इंदापूर २ हजार ६३२ , पुरंदर १ हजार ५३८, भोर १ हजार १९०, वेल्हे ४५०, आंबेगाव १ हजार ५७५, जुन्नर २ हजार ४११ आणि खेड २ हजार २१६ तालुक्यात असे एकूण २३ हजार ११४ मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले आहे.

जिल्ह्यात ३ हजार ६०५ मतदान केंद्र

बारामती तालुक्यात २९९, मावळ २४३, मुळशी २२७, शिरुर ३३७, हवेली २६३, दौंड ३१७, इंदापूर ४००, पुरंदर २३५, भोर २३७, वेल्हे १०५, आंबेगाव २३९, जुन्नर ३६६ आणि खेड ३३७ तालुक्यात असे एकूण ३ हजार ६०५ मतदान केंद्र आहेत. यामध्ये प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे १३ आदर्श व महिला मतदान केंद्र आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार निवारण कक्ष

निवडणुकीच्या अनुषंगाने प्राप्त तक्रारीवर कार्यवाही करण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हास्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला असून नागरिकांनी ०२०-२६१२३३७१ हेल्पलाईन क्रमांक तसेच १०७७ या टोलफ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन डुडी यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×