लोणावळ्यात महाविद्यालयीन तरुणीचा मृतदेह सापडला

कामावरुन काढून टाकल्याने एकाची आत्महत्या

टायगर पाॅईंट परिसरातील दरीत; पोलिसांकडून तपास सुरू

marathinews24.com

पुणे – गिर्यारोहणासाठी गेलेल्या नवी मुंबईतील तरुणीचा मृतदेह लोणावळ्यातील टायगर पाॅईंट परिसरातील दरीत सापडला. याप्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. ग्रामीण पोलिसांकडून प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. श्रेया पती (वय २०, रा. बेलापूर, नवी मुंबई) असे मृतावस्थेत सापडलेल्या तरुणीचे नाव आहे.

ऊस तोडणीसाठी गेलेल्या तरुणांना बेदम मारहाण – सविस्तर बातमी

लोणावळा परिसरातील नागफणी (ड्युक्स नोज) परिसरात श्रृती शनिवारी (दि. ३१) गिर्यारोहणासाठी गेली होती. श्रृती बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर पाेलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी या भागातील ग्रामस्थांकडे चौकशी केली. त्यानंतर पोलिसांनी शिवदुर्ग मित्र गिर्यारोहक संस्थेतील सदस्य सुनील गायकवाड, वैष्णवी भांगरे, महेश मसने यांच्यासह सहकाऱ्यांची मदत घेतली. घटनास्थळी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. पोलिसांना एक पर्स सापडली. त्यानंतर गिर्यारोहक योगेश उंबरे आणि सहकारी खोल दरीत दोराचा वापर करुन खाली उतरले.

पोलिसांनी ड्रोन कॅमेरे मागविले. अंधारात अत्याधुनिक ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करुन शोध घेण्यात आला. गिर्यारोहक चारशे फूट खोल दरीत उतरल्यानंतर एका भागात श्रेयाचा मृतदेह सापडला. रविवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास तिचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, उपविभागीय अधिकारी गजानन टोम्पे यांनी घटनास्थळी भेट दिली.लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे, लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेश रामाघरे, सहायक निरीक्षक राहुल लाड आणि पथकाने शोधमोहिम राबविली. ‘श्रृती दरीत कशी पडली, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. या प्रकरणी लोणावळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. श्रृती विधी अभ्यासक्रम करत होती’, अशी माहिती पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×