Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

ऊस तोडणीसाठी गेलेल्या तरुणांना बेदम मारहाण

अज्ञात ठिकाणी नेऊन मारहाण

marathinews24.com

बीड – ऊस तोडणीसाठी गेलेल्या तरुणांना वाहनातून अज्ञात ठिकाणी नेऊन जबरदस्त मारहाण केली आहे. त्यांच्या अंगावर मारहाणीचे वळ उठले असून हे तरूण गावाकडे पळून गेले आहेत. अद्याप याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही.

पतीने मोबाईल घेऊन दिला नाही; महिलेची मुलासह आत्महत्या – सविस्तर बातमी

केज तालुक्यातील केवड येथील श्रावण महादेव काळे आणि राहुल विलास काळे हे पारधी समाजातील दोन तरुण नागझरी येथील ऊसतोड मुकादम सोबत पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील बारामती जवळ असलेल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखाना येथे ऊस तोडणीसाठी गेले होते. दि. ३० जानेवारी, शुक्रवार रोजी त्या दोघांना एका पिक-अप मधून घेऊन जात सुमारे १० ते १२ लोकांनी त्यांना अमानुष व बेदम मारहाण केली. बेदम मारहाण झाल्या नंतर श्रावण महादेव काळे, राहुल विलास काळे हे त्यांच्या केज तालुक्यातील केवड या गावी आले. त्यानंतर दि. ३१ जानेवारी रोजी ते अशिक्षित असल्या कारणाने त्यांना झालेल्या मारहाणीची माहिती देण्यासाठी ते दोघे त्यांच्या नातेवाईक सोबत केज येथील पोलिस ठाण्यात आले आहेत.

मात्र मारहाणीची घटना केज पोलिस ठाणे हद्दीच्या बाहेर आणि जिल्ह्या बाहेर असल्या कारणाने गुन्हा नोंदवून घेण्या संदर्भात अडचणी येत आहेत. सदर मारहाण झालेल्या युवकांशी आणि त्यांच्या कुटुंबाशी संपर्क साधला असता, त्यांनी ऊसतोड मुकादम यांनी त्यांना एका वाहनाने धाराशिव जिल्ह्यातील ढोकी येथील साखर कारखान्याच्या परिसरात आणून रात्री बेदम मारहाण केली असे सांगितले आहे. तर ऊस तोड मुकादमाशी संपर्क साधला असता तो म्हणत आहे की, या मारहाणीशी त्याचा संबंध नसून त्या दोघांना त्यांच्या जात पंचायतीमध्ये मारहाण झाल्याचे सांगत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×