पतीने मोबाईल घेऊन दिला नाही; महिलेची मुलासह आत्महत्या

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

विहरीत उडी मारून उचलले टोकाचे पाऊल

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – पतीने नवीन मोबाईल घेऊन दिला नाही या रागातून २४ वर्षीय विवाहित महिलेने साडेतीन वर्षांच्या चिमुरड्या मुलासह विहिरीत उडी घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बीड तालुक्यातील लिंबारूई शिवारात घडलेल्या हृदयद्रावक घटनेत माय- लेकाचा जागीच मृत्यू झाला असून, याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धानोरीत भरदिवसा घरफोडी, ११ लाखांचे दागिने चोरीला – सविस्तर बातमी

प्राजक्ता उर्फ राधा रामेश्वर दराडे (वय २४ वर्ष, रा. लिंबारूई, ता. जि. बीड) वेदांत दराडे (वय ३ वर्षे ५ महिने) अशी मृत्युमुखी पडलेल्या माय लेकाची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राजक्ताने काही दिवसांपासून पतीकडे नवीन मोबाईलची मागणी केली होती. मात्र, पती रामेश्वर बाबासाहेब दराडे यांनी मोबाईल घेऊन न दिल्याने त्यांच्यात वाद झाले होते. याच कारणावरून आलेल्या संतापाच्या भरात प्राजक्ताने चिमुकल्या मुलासह विहिरीत उडी घेतली. या घटनेत माय- लेकाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना ३१ डिसेंबर २०२५ रोजी घडली होती. सुरुवातीला या प्रकरणाची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती. मात्र, पोलीस चौकशी दरम्यान धक्कादायक वास्तव समोर आले. रामेश्वर दराडे यांनी दिलेल्या पुरवणी जबाबानुसार, ३१ जानेवारी २०२६ रोजी या घटनेचा सविस्तर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. चिमुरड्या वेदांतचा पाण्यात बुडवून खून केल्याप्रकरणी मयत प्राजक्ता हिच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज करत आहेत. एका क्षुल्लक कारणावरून दोन जीवांचा असा अंत झाल्याने लिंबारूई परिसरात मोठी खळबळ उडाली असुन हळहळ व्यक्त होत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×